Header Ads

कोविड-19: जिल्हाभरात पोलीस नाकाबंदीत वाहनांवर जप्ती / दंडात्मक कारवाई
उस्मानाबाद - कोविड- 19 च्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने जमावबंदी व विविध मनाई आदेश लागू आहेत. असे असतांनाही काही उपद्रवी लोक त्या आदेशांचे उल्लंघन करत असतात. त्यांना पायबंद व्हावा या उद्देशाने जिल्ह्यातील 18 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत महत्वाच्या रस्त्यांवर दररोज नाकाबंदी केली जात आहे. नाकाबंदी दरम्यान कायदा- मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांची वाहन जप्ती / दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्या अनुशंगाने आज दि. 09.07.2020 रोजी 19.00 वा. पर्यंत तुळजापूर पो.ठा.- 75, शहर वाहतुक शाखा- 27, कळंब पो.ठा.- 27 अशी एकुण 129 वाहनांविरुध्द जप्ती / दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
No comments