Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल


पोलीस ठाणे, मुरुम: अनिल रेवनसिध्द मरबे व अन्य 2 व्यक्ती तीघे रा. आलुर, ता. उमरगा यांचा गावकरी- परमेश्वर सोमीनाथ सुतार व अन्य 3 व्यक्ती यांच्यात पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन दि. 01.07.2020 रोजी 20.30 वा. सु. मौजे आलुर येथे वाद झाला. या वादातून दोन्ही गटांनी परस्परविरोधी गटातील सदस्यांस शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गज, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
अशा मजकुराच्या दोन्ही गटांतील व्यक्तींनी दिलेल्या तक्रारीवरुन परस्परविरोधी स्वतंत्र 2 गुन्हे पो.ठा. मुरुम येथे दि. 02.07.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.


पोलीस ठाणे, वाशी: समाधान भरत सातपुते, रा. घाटपिंपरी, ता. वाशी यांना भाऊबंद-संतोष सातपुते, अरुण सातपुते, सुरज सातपुते, लक्ष्मण सातपुते, रेश्मा सातपुते या सर्वांनी पुर्वीच्या भांडणाच्या, व शेतीच्या वादाच्या कारणावरुन बेकायदेशीर जमाव जमवून दि. 01.07.2020 रोजी 18.30 वा. सु. मौजे घाटपिंपरी शिवारात समाधान सातपुते यांसह भाऊ- सचिन यांना शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी, कुऱ्हाडीच्या तुंब्याने, दगडाने मारहाण करुन जखमी केले व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या समाधान सातपुते यांच्या फिर्यादीवरुन नमूद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 02.07.2020 रोजी नोंदवला आहे.


पोलीस ठाणे, वाशी: नारायण रामभाऊ शिंदे, रा. पिंपळगाव (कं.), ता. वाशी यांसह त्यांची पत्नी- सुनिता शिंदे या दोघांना दि. 30.06.2020 रोजी 18.00 वा. सु. मौजे पिंपळगाव (कं.) येथे भाऊबंद- सुभाष शिंदे, मिना शिंदे, विलास शिंदे, कैलास शिंदे, विकास शिंदे, प्रियंका शिंदे, भाग्यश्री शिंदे अशा सर्वांनी बेकायदेशीर जमाव जमवून पुर्वीच्या भांडणाची कुरापत काढून नमूद दाम्पत्यास शिवीगाळ करुन, दगड- काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या सुनिता शिंदे यांच्या फिर्यादीवरुन नमूद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 03.07.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments