उस्मानाबादच्या व्यक्तीची ऑनलाइन फसवणूकउस्मानाबाद - 'तुमचे पेटीएम बँकेचे कॅश लिमीट वाढवायचे आहे’ असा फोन वासुदेव भगवान जावरे, रा. समता नगर, उस्मानाबाद यांना दि. 19.06.2020 रोजी 13.00 वा. आला. यास वासुदेव जावरे हे तयार झाले व त्यांनी समोरील व्यक्तीच्या सांगण्यावरुन आपल्या एटीएम- डेबीट कार्डवरील क्रमांक व कार्डच्या पाठीमागील तीन अक्षरी सीव्हीव्ही क्रमांक त्यास सांगितला.यावर वासुदेव जावरे यांना फोनवर एक पासवर्ड (ओटीपी) आला.

ओटीपी आलेला तो संदेश वाचुन खात्री न करताच जावरे यांनी समोरील व्यक्तीस ओटीपी सांगीतला. या माहितीच्या सहायाने समोरील व्यक्तीने वासुदेव जावरे यांच्या आयडीबीआय बँक खात्यातील 19,773/-रु. रक्कम झारखंड राज्यातील गिरीडीह जिल्ह्यात असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा भटींडा येथे ऑनलाईन पध्दतीने स्थलांतरीत करुन त्यांची फसवणूक केली.

अशा मजकुराच्या वासुदेव जावरे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन त्या मोबाईल धारकाविरुध्द भा.दं.सं. कलम- 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 अन्वये गुन्हा दि. 29.07.2020 रोजी नोंदवला आहे.

ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा 

 भुम: कविता उमेश नायकींदे, रा. पाटसांगवी, ता. भुम या सरपंच पदास अपात्र व्हाव्यात या उद्देशाने ग्रामसेवक- डी.एस. सरवदे यांनी धनादेश व एनईएफटी अर्जावर बनावट सह्या करुन ग्रामपंचायतीच्या बँक खात्यावरील 2,000/-रु. रक्कम सरपंच कविता नायकींदे यांच्या वैयक्तीक बँक खात्यात दि. 15.07.2020 रोजी टाकली. अशा मजकुराच्या कविता नायकींदे यांच्या प्रथम खबरेवरुन नमूद ग्रामसेवकाविरुध्द भा.दं.सं. कलम- 467, 468, 471, 420 अंतर्गत गुन्हा दि. 28.07.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments