Header Ads

उस्मानाबाद : तात्पुरत्या कारागृहातून कैद्याचे पलायनउस्मानाबाद -  कोविड- 19 साथीच्या रोगामुळे उस्मानाबाद शहरातील राजमाता जिजाऊ मुलींचे वस्तीगृह येथे तात्पुरते कारागृह उभारण्यात आले आहे. कोविड- 19 चा संसर्ग किंवा संशय असलेल्या कैद्यांना तेथे ठेउन उपचार केले जातात. यातील न्यायलयीन बंदी क्र. 146 /2020 गजा पंडीत शिंदे उर्फ सनी, वय 25 वर्षे, रा. अनाळा (रो.), ता. परंडा यास खोली क्र. 4 मध्ये ठेवण्यात आले होते. दरम्यान त्याने दि. 27.07.2020 रोजी रात्री 01.30 वा. खिडकीची जाळी- गज उचकटुन काढून पलायन केले. अशा मजकुराच्या कारागृह कॉन्स्टेबल- संदीप गांगुर्डे यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद कैद्या विरुध्द भा.दं.सं. कलम- 224 अन्वये पो.ठा. आनंदनगर येथे गुन्हा नोंदवला आहे.

No comments