Header Ads

उस्मानाबाद : चोरीच्या टॅबसह तरुणी ताब्यातउस्मानाबाद -  राजेंद्र महादेव गोरे, रा. तांबरी विभाग, उस्मानाबाद यांच्या राहत्या घराचा दरवाजा 01.07.2020 रोजी 12.30 वा. सु. उघडा असल्याची संधी साधुन अज्ञात चोरट्याने घरातील सॅमसंग टॅबलेट किं.अं. 12,000/-रु. चोरुन नेला होता. यावरुन उस्मानाबाद (श.) पो.ठा. येथे गु.र.क्र. 248/2020 भा.दं.वि. कलम- 380 नुसार दाखल आहे.
सदर गुन्हा तपासात स्था.गु.शा. च्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे उस्मानाबाद तालुक्यातील एका तरुणीस (नाव- गाव गोपनीय) ताब्यात घेउन तीच्या ताब्यातून चोरीस गेलेला नमुद मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील कारवाईस्तव त्या तरुणीस उस्मानाबाद (श.) पो.ठा. ताब्यात दिले आहे.
ही कारवाई स्था.गु.शा. चे पो.नि. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि श्री. पांडुरंग माने, सपोफौ- खोत, पोहेकॉ- थोरात, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, महिला पोकॉ- सोनवणे यांच्या पथकाने केली आहे. 

No comments