Header Ads

सुनेचा छळ, गुन्हा दाखलपोलीस ठाणे, नळदुर्ग: सुन- सारिका शिवानंद कारले, रा. जळकोट, ता. तुळजापूर यांनी माहेरहुन पैसे आणावेत याकरीता 1) शिवानंद विश्वनाथ कारले (पती) 2)विश्वनाथ कारले (सासरा) 3)रेणुका कारले 4)सिध्दु कवटे (पतीचे मामा) 5)रत्नाबाई कवटे (पतीची मामी), सर्व रा. जहकोट, ता. तुळजापूर यांनी सन 2018 पासून वेळोवेळी शारिरीक- मानसिक त्रास दिला. तसेच सारिका यांचे वडील समजावून सांगण्यासाठी गेले असता त्यांनाही धक्काबुक्की करुन मारहाण केली. अशा मजकुराच्या सारिका कारले यांच्या प्रथम खबरेवरुन नमूद आरोपींविरुध्द भा.दं.वि. कलम- 498 (अ), 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दि. 01.07.2020 रोजी नोंदवला आहे.


जुगार अड्ड्यावर छापा.”
पोलीस ठाणे, कळंब: 1)मोहसीन मिर्झा 2)किरण लोखंडे 3)तय्यब शेख 4)अमीर मिर्झा 5)आबेद सय्यद 6)हुजेब बागवान 7)उमराव मिर्झा 8)गजानन शेळवणे 9)विकास मदने 10)असलम शेख, सर्व रा. कळंब हे सर्व जण दि. 30.06.2020 रोजी कळंब येथील शिवप्रसाद लॉज मध्ये तिरट जुगार खेळतांना जुगार साहित्यासह रोख रक्कम मोबाईल फोन, मो.सा. सह एकुण 2,11,840/-रु. च्या मालासह पो.ठा. कळंब च्या पथकास आढळुन आले. यावरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा नोंदवला आहे.


अवैध मद्य विक्री विरोधी कारवाया.
पो.ठा., वाशी: आबा अंबरुषी काळे, रा. गोलेगाव, ता. वाशी हा दि. 01.06.2020 रोजी आपल्या राहत्या घरा समोर दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने 17 ली. गावठी दारु (किं.अं. 1,060/-रु.) बाळगाला असतांना स्थानिक गुन्हे शाखा च्या पथकास आढळला. यावरुन त्याच्याविरुध्द पो.ठा. वाशी येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.No comments