मनाई आदेश झुगारुन विनापरवाना जिल्हा प्रवेश, ग्रामसेवकातर्फे गुन्हा दाखल
भुम: कोविड- 19 संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्याती सर्व सिमा विनापरवाना प्रवासास बंद आहेत. असे असतांनाही 1)लखन अशोक नन्नवरे, रा. जामखेड, जि. अहमदनगर हे अन्य 2 व्यक्ती असे तीघे जण एका मोटारसायकलवर बसून दि. 13.07.2020 रोजी विनापरवाना जयवंतनगर या गावात आले. जयवंतनगर हे गाव कोविड- 19 संसर्गामुळे प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत असतांनाही त्या गावात त्यांनी प्रवेश केला. अशा प्रकारे नमूद सर्वांनी कोविड- 19 संसर्ग होण्याची शक्यता निर्माण करण्याची निष्काळजीपणाची कृती केली आहे.

यावरुन ग्रामसेवक- त्रिंबक भोसले यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द पो.ठा. भुम येथे गुन्हा नोंदवला आहे.


अवैध मद्य प्रतिबंधक कारवाया

पो.ठा., मुरुम: गोविंद गुलाव गायकवाड, रा. कोराळ, ता. उमरगा हा दि. 18.07.2020 रोजी मौजे कोराळ शिवारातील आर्यन ढाब्याच्या पाठीमागे दारुचा विनापरवाना विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने विदेशी दारुच्या 12 बाटल्या (किं.अं. 1,488/-रु.) कब्जात बाळगला असतांना पो.ठा. मुरुम च्या पथकास आढळला.

पो.ठा., वाशी: तानाजी शहाजी काळे, रा. पार्डी, ता. वाशी हा दि. 18.07.2020 रोजी पार्डी फाटा परिसरात दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने 35 ली. गावठी दारु (किं.अं. 3,035/-रु.) कब्जात बाळगला असतांना पो.ठा. वाशी च्या पथकास आढळला.
       यावरुन दोन्ही घटनेतील दारु जप्त करुन नमूद दोघांविरुध्द संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

No comments