तुळजापूरजवळ अपघात, दोन जखमीपोलीस ठाणे, तुळजापूर: विश्वंभर किसन कुलकर्णी, वय 60 वर्षे, रा. सिंदफळ, ता. तुळजापूर यांसह गावातील- बालाजी सुभाष शिंदे उर्फ मनोज हे दोघे दि. 19.07.2020 रोजी दुपारी 03.30 वा. मोटारसायकल एम.एच. 25 एक्यु 1815 ने तुळजापूर येथे जात होते. ते प्रवासा दरम्यान तुळजापूर घाटात आले असता घाटातून खाली उतरणारा ट्रक क्र. एम.एच. 17 बीडी 7004 हा त्यांच्या अंगावर पलटला. यात विश्वंभर कुलकर्णी मयत झाले तर बालाजी शिंदे हे गंभीर जखमी झाले. संबंधीत ट्रक चालकाने निष्काळजीपणे, भरधाव ट्रक चालवल्याने तो पलटला. अशा प्रकारे या अपघातास- मृत्युस नमूद ट्रकचा अज्ञात चालक जबाबदार आहे. अशा मजकुराच्या गीता विश्वंभर कुलकर्णी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन अज्ञात चालकाविरुध्द भा.दं.सं. कलम- 304 (अ), 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अन्वये गुन्हा दि. 20.07.2020 रोजी नोंदवला आहे.


चोरी.
पो.ठा., तामलवाडी: रफिक जमाल शेख, रा. नांदुरी, ता. तुळजापूर यांच्या गावातीलच वेल्डींग दुकानाचे कुलूप दि. 19.07.2020 रोजी मध्य रात्री अज्ञात चोरट्याने तोडून आतील  वेल्डींग मशीन- 1 नग, हॅन्ड ग्राईंडर- 2 नग, ड्रील मशीन- 3 नग यांसह वायर्स, वेल्डींग रॉड पुडके, पक्कड व इतर साहित्य असा एकुण 19,400/-रु. किंमतीचा माल चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या रफिक शेख यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 20.07.2020 रोजी नोंदवला आहे.

जुगार प्रतिबंधक कारवाई.
पो.ठा., मुरुम: स्वामीनाथ व्यंकट राठोड, रा. आलुर, ता. उमरगा हा दि. 19.07.2020 रोजी मौजे आलुर येथे सुरट जुगार खेळत असतांना जुगाराचे साहित्य व रोख रक्कम 840/-रु. सह पो.ठा. मुरुम यांच्या पथकास आढळला. यावरुन नमूद आरोपीविरुध्द पो.ठा. मुरुम येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

No comments