Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल


पोलीस ठाणे, लोहारा: जालिंदर श्रावण कोकणे, रा. लोहारा यांसह बसवेश्वर मागासवर्गीय गृहनिर्माण सोसायटी सभासद यांना दि. 01.07.2020 रोजी 12.5.15 व. सु. बसवेश्वर गृह निर्माण सोसायटी येथे कॉलनीतीलच- विष्णु भिमराव नारायणकर व शामसुंदर नारायणकर या दोघांनी भुखंडाच्या कारणावरुन शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या जालिंदर कोकणे यांच्या फिर्यादीवरुन नमूद दोघांविरुध्द गुन्हा दि. 01.07.2020 रोजी नोंदवला आहे.


पोलीस ठाणे, ढोकी: महेश गणपत कांबळे, रा. तडवळे (क.), ता. उस्मानाबाद हे दि. 29.06.2020 रोजी 15.00 वा. सु. मौजे तडवळा (क.) येथील विठ्ठल मंदीर जवळ बोलत थांबले होते. यावेळी गावातीलच- अशोक निकाळजे, रणजित निकाळजे, अजित निकाळजे, दिपक निकाळजे या चौघांनी पुर्वीच्या भांडणाची कुरापत काढून महेश कांबळे यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, विटाने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या महेश कांबळे यांच्या फिर्यादीवरुन नमूद चौघांविरुध्द गुन्हा दि. 01.07.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, तुळजापूर: दिलीप काशीनाथ चंदनशिवे, रा. तडवळा, ता. तुळजापूर हे त्यांच्या कुटूंबीयांसह दि. 21.06.2020 रोजी सकाळी 08.30 वा. सु. आपल्या राहत्या घरी होते. यावेळी गावकरी- जगन्नाथ मस्के, रघुनाथ मस्के, गुरुनाथ मस्के, सोमनाथ मस्के, अजय मस्के, विजय मस्के, विशाल मस्के या सर्वांनी दिलीप चंदनशिवे यांच्या घरा समोर बेकायदेशीर जमाव जमवून खटला दाखल केल्याच्या कारणावरुन दिलीप चंदनशिवे यांसह मुलगा- आकाश  यास लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गजाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच दिलीप यांच्या खिशातील 5,000/- रु. काढून घेतले. अशा मजकुराच्या दिलीप चंदनशिवे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन नमूद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 02.07.2020 रोजी नोंदवला आहे.
                                                                                     

No comments