Header Ads

दुय्यम दर्जाचे सोयाबीन बियाणे पुरवून फसवणुक, 2 गुन्हे दाखलउस्मानाबाद - शेतकऱ्यांना बोगस बियाणे देऊन फसवणूक करणाऱ्या दोन कंपन्याविरुद्ध उस्मानाबाद पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनची पेरणी करून उगवण नझाल्याने अनेक शेतकरी संकटात सापडले होते. राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे हे उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता, शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर कृषी अधिकाऱ्याने पंचनामे करून पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली होती. 

उस्मानाबाद तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बियाणे बाबतच्या तक्रारीच्या अनुशंगाने बियाणे निरीक्षक तथा कृषी अधीकारी, उस्मानाबाद बापु रोहीदास राउत व ज्ञानेश्वर रामराव जाधव, यांनी शेतकऱ्यांचे शेतात जाउन पिकाची पाहणी केली. यावेळी त्यांना 7- 23 % व 35- 40 % बियाणाची उगवण झाल्याचे दिसुन आले. यावरुन 1)गजानन किसनराव काळे- बसंत ॲग्रोटेक ई, लि, अकोला, 530030 बियाणे कंपनीचे संचालक 2)दगडु नानाभाउ अंभोरे- कृषीधन सिडस प्रा.लि. जालना कंपनीचे संचालक व्यवस्थापक (मुख्य कार्यालय साई कॅपीटल- 9 वा मजला, शिवाजी नगर, पुणे) या दोन कंपनीने स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी शेतकऱ्यांना दर्जाहीन सोयाबीन बियाणे पुरवठा केल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवली असुन संबंधीत बियाणे उत्पादकांनी शेतकऱ्यांची व शासनाची फसवणुक केली आहे. अशा मजकुराच्या नमूद दोन कृषी अधिकारी यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन वर नमूद दोन्ही कंपनी विरुध्द भा.दं.सं. कलम- 420 सह बी- बियाणे कायदा व बी- बियाणे नियम अन्वये पो.ठा. उस्मानाबाद (श.) येथे स्वतंत्र 2 गुन्हे दि. 04.07.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

No comments