उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखलतुळजापूर: शेतातील सामाईक विहीरीतील काढलेल्या गाळाच्या आर्थिक व्यवहाराच्या कारणावरुन राजेंद्र पांडुरंग मेटे, महेश मेटे, दोघे रा. वडगांव (लाख), ता. तुळजापूर या दोघांनी दि. 05.07.2020 रोजी 20.00 वा. सु. भाऊबंद- अशोक किसन मेटे यांच्या घरी जाउन त्यांना व त्यांच्या पत्नीस शिवीगाळ करुन, काठी- दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अशोक मेटे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबावरुन नमूद दोघांविरुध्द गुन्हा दि. 17.07.2020 रोजी नोंदवला आहे.

  परंडा: मौजे बोडखा, ता. परंडा येथील खवले कुटूंबातील- मेघनाथ, अविनाश, उमेश, रमेश, मंगेश, विशाल, आदित्य खवले अशा सात जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून दि. 05.07.2020 रोजी 09.30 वा. सु. गावातील- राजेंद्र पाटील यांच्या घरा समोर येउ त्यांना शिवीगाळ करत होते. यावर राजेंद्र पाटील यांनी त्याचा जाब विचारला असता नमूद आरोपींनी राजेंद्र पाटील यांसह मुलगा- अमित या दोघांना लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच राजेंद्र यांच्या खिशातील 4,000/-रु तर अमित यांच्या हातच्या बोटातील 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी जबरीने काढून घेतली.

अशा मजकुराच्या राजेंद्र पाटील यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जाबाबावरुन नमूद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 17.07.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

1 comment

Unknown said...

मस्त बातमी असतात