Header Ads

जमावबंदी उल्लंघन, मास्क वापर नाही, दुकाने उघडी, 3 गुन्हे दाखल
उस्मानाबाद-  संसर्गजन्य आजार कोरोनाच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने जमावबंदी जाहीर आहे. रोग प्रसार टाळन्यासाठी नाका- तोंडास मास्क लावने गरजेचे आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने, आस्थापना बंदचा आदेश आहे. अशा विविध मनाई आदेशांचे उल्लंघन करुन दि. 09.07.2020 रोजी उमरगा शहरात सार्वजनिक ठिकाणी स्वत:च्या व इतरांच्या आरोग्याची काळजी न घेता नाका-तोंडास मास्क न लावता थांबलेले 1)नंदकुमार गुरव 2)दयानंद धनेराव, दोघे रा. माडज 3)अमोल पवार 4)गोविंद सुभाष राठोड 5)गोविंद राठोड, तीघे, रा. अंबरनगर तांडा, मुरुम तर, उस्मानाबाद शहरात मनाई आदेश झुगारुन पानटपरी चालु ठेउन तंबाखजन्य पदार्थांची विक्री करणारे 6)रामहरी किसन सुतार, रा. रुईभर, ता. उस्मानाबाद, तसेच ग्राहकांसाठी हॉटेल चालू न ठेवता फक्त पार्सल सुविधा देण्याचा आदेश असतांनाही दि. 31.05.2020 रोजी मौजे रत्नापुर, ता. कळंब येथील ‘जाधवर बंधु धाबा’ येथे 7)रंगा वसंत जाधवर उर्फ दत्ता, रा. रत्नापूर यांनी ग्राहकांना जेवण दिले.

            यावरुन पोलीसांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन वरील 7 व्यक्तींविरुध्द संबंधीत पो.ठा. येथे स्वतंत्र 3 गुन्हे भा.दं.सं. कलम- 188, 269 अन्वये दि. 09.07.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

No comments