मनाई आदेश झुगारले 5 गुन्हे दाखलउस्मानाबाद  कोविड- 19 रोगाच्या संक्रमनास आळा बसावा यासाठी मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष- आपत्ती व्यवथापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांच्या आदेशाने उस्मानाबाद शहरात / जिल्ह्यात विविध मनाई आदेश अंमलात आहेत. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द खालील गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

1) उस्मानाबाद नगरपरीषद हद्दीत अत्यावश्यक सेवा- दुकाने, आस्थापना वगळता संचारबंदी अंमलात असुन वेळेचे बंधन आहे. या मनाई आदेशांचे उल्लंघन करुन दि. 15.07.2020 रोजी 20.30 वा. सु फरास गल्ली येथे 1) ईरफान सय्यद हे किराणा दुकान तर 2) फारुख मुजावर हे बेकरी दुकान चालू ठेउन व्यवसाय करत असतांना पो.ठा. उस्मानाबाद (श.) यांच्या पथकास अढळले. यावरुन त्या दोघांविरुध्द स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

2) दादा गुणवंत कांबळे, रा. उस्मानाबाद व अन्य चौघे इसम यांनी दि. 15.07.2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोरील रस्त्याच्या दुभाजकात असणाऱ्या पथ दिव्यांच्या खांबांवर पालकमंत्री गडप- मिसींग अशा मजकुराची पत्रे चिकटवली व हातात घेउन मिरवली. असे करतांना त्यांनी संचारबंदी, सोशल डीस्टन्सींग, मास्क न घालने अशा विविध मनाई आदेशांचे उल्लंघन करत असतांना आनंदनगर पो.ठा. च्या पथकास आढळले.

3) सतिश नारायण मस्के, रा. तेरखेडा यांनी दि. 15.07.2020 रोजी रात्री 08.00 वा. तेरखेडा येथील आपल्या ‘हॉटेल उत्ततम’ मध्ये ग्राहकांना जेवन देउन व्यवसाय करत असतांना पो.ठा. येरमाळा यांच्या पथकास आढळले.

4) मौजे तुरोरी येथे कोविड- 19 रुग्ण आढळल्याने तेथील लोकवस्ती प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत करण्यात आली आहे. दि. 16.07.2020 रोजी गावकरी- जमीर अब्दुल्ला चपराशी, रा. तुरोरी, ता. उमरगा हे पिक अप वाहन क्र. के.ए. 56- 3108 घेउन कंटेन्टमेंट झोन बाहेर घेउन जात होते. यावेळी पोलीस पाटील- प्रशांत कालीदास जाधव यांनी त्यांना तसे करण्यास मनाई केली. तरीही ते कंटेन्टमेंट झोन मधून वाहन घेउन बाहेर गेले. यावरुन पोलीस पाटील यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द गुन्हा नोंदवला आहे.
वरील प्रमाणे मनाई आदेशांचे उल्लंघन केल्या प्रकरणी सरकार तर्फे देण्यात आलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद आरोपींविरुध्द भा.दं.सं. कलम- 188, 269 सह महाराष्ट्र कोविड- 19 उपाय योजना नियम- 11 अन्वये संबंधीत पो.ठा. येथे स्वतंत्र 5 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

No comments