Header Ads

पत्नीचा छळ केला, गुन्हा दाखल


पोलीस ठाणे, परंडा: मंजुषा सुनिल अंधारे, रा. माणकेश्वर, ता. भुम यांना तीन मुली झाल्याने मुलगा होत नसल्याच्या कारणावरुन पती- सुनिल माणिक अंधारे यांनी गेली 3 वर्षे त्यांचा शारिरीक- मानसिक छळ करत होता. दि. 03.07.2020 रोजी 22.00 वा. सु. मंजुषा अंधारे राहत असलेल्या घरी पती- सुनिल अंधारे याने जाउन मंजुषा व 3 मुलींना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन घरातील 11 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने व रोख रक्कम 3,000/-रु. असा एकुण 34,000/-रु. चा माल जबरीने चोरुन घेउन गेला. अशा मजकुराच्या मंजुषा अंधारे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पती- सुनिल अंधारे याच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 392, 497 (अ), 323, 504 अन्वये गुन्हा दि. 05.07.2020 रोजी नोंदवला आहे.

अल्पवयीन मुलीचे अपहरण.
पोलीस ठाणे, मुरुम: एका 17 वर्षीय मुलीचे (नाव- गाव गोपनीय) दि. 01.07.2020 रोजी 23.00 वा. सु. तीच्या राहत्या घरातून अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केले आहे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्ती विरुध्द गुन्हा दि. 05.07.2020 रोजी नोंदवला आहे.

रस्ता अपघात, 2 गुन्हे दाखल.
पोलीस ठाणे, आनंदनगर: रमेश साहेबराव जाधव, रा. खर्डा, ता. कळंब हे दि. 05.07.2020 रोजी 18.30 वा. सु. मौजे शिंगोली शिवारातील उपळा फाटा येथील रस्त्याने मो.सा. क्र. एम.एच. 25 एए 3208 ही चालवत जात होते. यावेळी मो.सा. क्र. एम.एच. 25 एजी 0406 च्या अज्ञात चालकाने मो.सा. निष्काळजीपणे चालवून रमेश जाधव यांच्या मो.सा. ला जोराची धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर जखमीस वैद्यकीय उपचाराची तजबीज न करता, अपघाताची खबर पोलीसांना न देता नमूद मो.सा. चा अज्ञात चालक घटनास्थळावरुन निघून गेला. अशा मजकुराच्या रमेश जाधव यांच्या फिर्यादीवरुन संबंधीत मो.सा. चालकाविरुध्द गुन्हा दि. 05.07.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, तुळजापूर: श्रीमती- सुदामती लक्ष्मण धनके, रा. सिंदफळ, ता. तुळजापूर या आपल्या पतीसह दि. 19.06.2020 रोजी 12.30 वा. सु. तुळजापूर बस स्थानकाकडे तुळजापूर- सोलापूर रस्त्याने पायी चालत जात होत्या. यावेळी प्लॅटीना मो.सा. क्र. एम.एच. 13- 0253 च्या अज्ञात चालकाने मो.सा. निष्काळजीपणे चालवून श्रीमती- सुदामती धनके यांना पाठीमागुन जोराची धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर जखमीस उपचारकामी न नेता, अपघाताची खबर पोलीसांना न देता संबंधीत मो.सा. चालक घटनास्थळावरुन निघुन गेला. अशा मजकुराच्या सुदामती धनके यांच्या फिर्यादीवरुन नमूद मो.सा. च्या अज्ञात चालकाविरुध्द गुन्हा दि. 05.07.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments