Header Ads

कोल्हेगाव : चोरीस गेलेली म्हैस जप्त, 2 आरोपी अटकेत
उस्मानाबाद : भास्कर विश्वंभर टेकाळे, रा. कोल्हेगाव, ता. उस्मानाबाद यांच्या घरालगत असलेल्या गोठ्यातील मुऱ्हा जातीची म्हैस (किं.अं. 80,000/-रु.) दि. 09.07.2020 रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेली होती. यावरुन पो.ठा. ढोकी येथे गु.र.क्र. 188/2020 दाखल आहे.

सदर गुन्हा तपासात स्था.गु.शा. च्या पथकाने गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या खबरेच्या आधारे आरोपी- 1) सुनिल उध्दव चव्हाण, वय 27 वर्षे, रा. ढोकी, ता उस्मानाबाद 2)किशोर शेषेराव पाडोळे, वय 32 वर्षे, रा. निवळी, ता. लातुर या दोघांना दि. 12.07.2020 रोजी ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेली म्हैस व चोरी करण्यासाठी वापरलेले वाहन जप्त केले आहे. पुढील कारवाईस्तव नमूद दोघांना पो.ठा. ढोकी च्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई स्था.गु.शा. चे पो.नि. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि श्री. पांडुरंग माने, पोहेकॉ- जगताप, प्रमोद थोरात, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, कावरे, पोकॉ- अविनाश मरलापल्ले यांच्या पथकाने केली आहे. 

No comments