Header Ads

मनाई आदेश झुगारला: हॉटेल मालक, कामगारांवर पोलीसांतर्फे 3 गुन्हे दाखल
 येरमाळा: कोविड- 19 रोगाच्या संक्रमनास आळा बसावा यासाठी मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने विविध मनाई आदेश अंमलात आहेत. त्या मनाई आदेशांचे उल्लंघन करुन दि. 10.07.2020 रोजी 16.30 ते 18.20 वा. चे दरम्यान मौजे रत्नापुर फाटा येथे 1)बालाजी भगवान बांगर, रा. येरमाळा, ता. कळंब 2)गोविंद शिवाजी मुंढे, रा. दुधाळवाडी, ता. कळंब 3)सोमनाथ विठ्ठल नरसाळे, रा. शिराळा, ता. बार्शी अशा तीघांनी आपापल्या ताब्यातील अनुक्रमे ‘हॉटेल बांगर, हॉटेल मुंढे बंधु, हॉटेल श्रावणी’ या तीन हॉटेलात स्वत: हॉटेल मालक व कामगारांना नाका- तोंडास मास्क न लावता, सामाजीक सुरक्षीत अंतराचे पालन न करता हॉटेलात कामकाज करत असतांना पो.ठा.  येरमाळा यांच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद तीघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 188, 269 अन्वये स्वतंत्र 3 गुन्हे दि. 10.07.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

No comments