Header Ads

विनापरवाना जिल्हा प्रवेश: पोलीस पाटील यांनी केला 3 व्यक्तींवर गुन्हा दाखल
परंडा: कोविड- 19 रोगाच्या संक्रमनास आळा बसावा यासाठी मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष- आपत्ती निवारण प्राधिकरण यांच्या आदेशाने विनापरवाना प्रवेशास जिल्ह्याच्या सिमा बंद आहेत. असे असतांनाही 1)दिपक मोहन लष्कर 2)आकाश अभिमान लष्कर, दोघे रा. करमाळा, जि.सोलापूर 3)विकास श्रीधर कानटे, रा. कोथरुड, जि. पुणे हे तीघे दि. 06.07.2020 रोजी 15.00 वा.सु. ओम्नी वाहन क्र. एम.एच. 45 डी 0172 ने पोलीस नाकाबंदीस टाळून छुप्या मार्गाने सोलापुर- करमाळा असा प्रवास करत मौजे बावची, ता. परंडा येथे आले. कोविड- 19 चा संसर्ग होण्याच्या शक्यतेची जाणीव असतानाही त्या तीघांनी असे निष्काळजीपणाचे कृत्य केले.
यावरुन मौजे बावची गावचे पोलीस पाटील- विजय रोडगे यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन त्या तीघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 188, 269, सह महाराष्ट्र कोविड- 19 उपाय योजना नियम- 11 अन्वये गुन्हा दि. 06.07.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

1 comment

AMBADAS V GORE said...

अगदी योग्य आहे.