कळंब : मनाई आदेश झुगारणाऱ्या दुकान, हॉटेल चालकांवर, पोलीसांतर्फे 7 गुन्हे दाखल
 कळंब: कोविड- 19 रोगाच्या संक्रमनास आळा बसावा यासाठी शासन तसेच जिल्हा प्रशासन यांनी दुकाने, हॉटेल इत्यादी आस्थापना यांसाठी विविध मनाई आदेश जारी केले आहेत. या आदेशांचे उल्लंघन करुन   दि. 20.07.2020 रोजी 11.45 ते 12.10 वा. चे दरम्यान कळंब शहरात 1)आवेज अब्दुल गफार यांनी ‘जनैदी कलेक्शन’ 2)शहाजी बब्रुवान मगर यांनी ‘सत्यम इलेक्ट्रीकल्स’ 3)सुमित शशांक मोदी यांनी ‘डेनिम कलेक्शन’ 4)दिनेश बबनराव आष्टेकर यांनी ‘आष्टेकर स्टिल सेंटर’ 5)शम्मु हमीद पिंजारी यांनी ‘समीर गादीघर’ 6)मुज्जमिर रफिक शेख यांनी ‘लकी क्लॉथ सेंटर’ अशा 6 दुकानां मध्ये कोविड- 19 संसर्गाच्या अनुशंगाने ग्राहकांच्या सुरक्षीततेसाठी कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतली नाही. तसेच स्वत: च्या- कामगारांच्या नाका- तोंडास मास्क न लावता, ग्राहकांत सुरक्षीत अंतर न ठेवता दुकाने व्यवसायासाठी चालू ठेवली.

दुसऱ्या घटनेत महादेव भिमराव बोरगे, रा. सावरगांव, ता. कळंब यांनी त्याच दिवशी 18.25 वा. सु. एमआयडीसी, कळंब येथील आपल्या ‘तुळजाभवानी हॉटेल’ व्यवसाय चालू ठेउन कोविड- 19 संसर्गाच्या अनुशंगाने कोणतीही खबरदारी न बाळगता हॉटेल मध्ये 15 ग्राहकांना जेवन दिले.

वरील प्रमाणे मनाई आदेशांचे उल्लंघन केल्या प्रकरणी पोलीसांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद 7 आरोपींविरुध्द भा.दं.सं. कलम- 188, 269 सह महाराष्ट्र कोविड- 19 उपाय योजना नियम- 11 सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये पो.ठा. कळंब येथे स्वतंत्र 7 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

No comments