Header Ads

गर्दी जमवून धार्मीक कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यावर गुन्हा दाखल


पोलीस ठाणे, कळंब: कोविड- 19 रोगाच्या संक्रमनास आळा बसावा यासाठी शासनाने सोशल डिस्टन्सींग, कार्यक्रमातील सदस्य संख्या इत्यादीं विषयी बंधने घातली आहेत. या आदेशांचे जाणीवपुर्वक उल्लंघन करुन सुरेश भाउराव शिंदे, रा. वाकडी, ता. कळंब यांनी दि. 30.06.2020 रोजी 18.30 वा. सु.मौजे वाकडी येथील आपल्या शेतात सुमारे 600 व्यक्तींना एकत्र जमवून कार्यक्रमाचे आयोजन केले.
यावरुन त्यांच्याविरुध्द पोहेकॉ- सचिन गायकवाड यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन गुन्हा दि. 30.06.2020 रोजी नोंदवला आहे.

मारहाण.
पोलीस ठाणे, तामलवाडी: गुरप्पा लक्ष्मण राठोड, रा. खडकी तांडा, ता. तुळजापूर हे दि. 15.06.2020 रोजी 18.00 वा. सु. आपल्या राहत्या घरी होते. यावेळी तांड्यावरीलच जाधव परिवारातील शंकर जाधव शिवाजी, मिथुन, हरीष, लिंबाजी, मोहन, चांदुबाई तर दक्षी तांडा, ता. तुळजापूर येथील शुभम चव्हाण, उमेश चव्हाण, मिनाबाई राठोड, ऋतीक चव्हाण, अशा सर्वांनी बेकायदेशीर जमाव जमवून गुरप्पा राठोड यांच्या घरी जाउन पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन गुरप्पा राठोड यांना लोखंडी गज, दगड- काठीने मारहाण करुन जखमी केले. गुरप्पा राठोड यांना होत असलेली मारहाण सोडवण्यास आलेल्या त्यांच्या कुटूंबीयांनाही शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या गुरप्पा राठोड यांच्या फिर्यादीवरुन नमूद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 01.07.2020 नोंदवला आहे.

चोरी.
पोलीस ठाणे, ढोकी: अमोल अनंतराव समुद्रे, रा. ढोकी, ता. उस्मानाबाद यांनी मौजे ढोकी येथील आपल्या शेतातील गोठ्यात बांधलेली म्हैस किं.अं. 40,000/-रु. ची दि. 30.06.2020 रोजी मध्य रात्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या अमोल समुद्रे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुनहा दि. 01.07.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments