Header Ads

न्यायप्रविष्ट गुन्ह्यातील फरारी- (Abscondal) आरोपी अटक


स्थानिक गुन्हे शाखा: कळंब पो.ठा. गु.र. क्र. 50/2005 हा मारहाणीचा गुन्हा न्यायप्रविष्ट आहे. त्यातील फरारी आरोपी- बाळु भास्कर जगताप, वय 35 वर्षे रा. लाखा, ता. केज यास स्था.गु.शा. च्या पथकाने खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरुन दि. 11.07.2020 रोजी ताब्यात घेउन उर्वरीत तपासकामी पो.ठा. कळंब च्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई स्था.गु.शा. चे पो.नि. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखालील सपोफौ- खोत, पोहेकॉ- रोकडे, पोकॉ- दिपक लाव्हरेपाटील, महिला पोकॉ- सोनवणे यांच्या पथकाने केली आहे. मनाई आदेशांचे उल्लंघन 203 पोलीस कारवायांत 45,100/-रु. दंड वसुल

उस्मानाबाद कोविड- 19 संबंधी प्रशासनाने काढलेल्या मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द उस्मानाबाद पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व इतर शाखां मार्फत दि. 10.07.2020 रोजी खालील दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.
1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: 148 कारवायांत- 29,600/- रु. दंड प्राप्त झाला आहे.
2)सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे: 3 कारवायांत- 1,500/-रु. दंड प्राप्त झाला आहे.
3)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: सोशल डिस्टन्सींग टाळुन दुकाना समोर गर्दी निर्माण केली इत्यादी प्रकरणांत 40 कारवायांत 8,000/-रु. दंड प्राप्त झाला आहे.
4)कार- मोटारसायकलवर जादा प्रवासी बसवणे: लॉकडाउन काळात मोटारवाहनांतील प्रवासी मर्यादेचे उल्लंघन केल्या प्रकरणी 12 कारवायांत 6,000/- रु. दंड प्राप्त झाला आहे.


कोविड- 19: नाकाबंदी दरम्यान 430 कारवाया- 97,700 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त

उस्मानाबाद  कोविड- 19 च्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने जमावबंदी व विविध मनाई आदेश लागू आहेत. या उद्देशाने जिल्ह्यातील 18 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत महत्वाच्या रस्त्यांवर वाहतुक शाखेच्या सहकार्याने दि. 10.07.2020 रोजी नाकाबंदी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान मोटार वाहन कायदा अंतर्गत 430 कारवायांत 97,700 ₹ ‘तडजोड शुल्क’ प्राप्त झाले आहे.

No comments