Header Ads

कर्नाटक राज्य, पुणे, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात लुटमारी, खून करणारा आरोपी अटकेत
उस्मानाबाद -  कर्नाटक राज्य, पुणे, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात लुटमारी, खुन करणारा एका आरोपीस अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसाना यश आले आहे. रामा कल्याण काळे उर्फ रामेश्वर, वय 55 वर्षे, रा. ईटकूर पारधी पिढी, ता. कळंब  असे या आरोपीचे नाव आहे.


पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन व अपर पोलीस अधीक्षक  संदीप पालवे यांनी गंभीर गुन्ह्यातील पाहिजे- फरारी आरोपींचा शोध मोहिम उघडली आहे. त्या अनुषंगाने दि. 08.07.2020 रोजी स्था.गु.शा. चे पथक पाहिजे- फरारी आरोपींच्या शोधकामी कळंब तालुक्यात गस्त करत होते.

दरम्यान पथकास मौजे कन्हेरवाडी पाटी जवळ एक व्यक्ती संशयीत रित्या फिरतांना आढळला. पथकाची चाहुल लागताचा तो पळू लागल्याने पोलीसांनी त्यास पकडून विचारपुस केली असता प्रथम त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली.

 पोलीसांनी त्यास ताब्यात घेउन त्याच्या पुर्व इतिहासाची पडताळणी केली असता त्याचे नाव- रामा कल्याण काळे उर्फ रामेश्वर, वय 55 वर्षे, रा. ईटकूर पारधी पिढी, ता. कळंब असे समजले. तसेच त्याच्यावर उस्मानाबाद जिल्ह्यात- 1, बीड जिल्ह्यात- 1, पुणे जिल्ह्यात- 5, कर्नाटक राज्यात-5 चोरी- लुटमारीचे असे एकुण- 12 गुन्हे दाखल आहेत. पोलीसांनी त्याच्याविरुध्द म.पो.का. कलम- 122 अन्वये गुन्हा दाखल करुन त्यास पुढील कारवाईस्तव पो.ठा. कळंब यांच्या ताब्यात देण्यात आले. बीड जिल्ह्यातील केज पो.ठा. हद्दीत मंदीरातील चोरी करतांना खुन केलेल्या गुन्ह्यात त्यास केज पो.ठा. च्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई स्था.गु.शा. चे पो.नि.  दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखालील पोउपनि. पांडुरंग माने, पोहेकॉ- जगताप, प्रमोद थोरात, पोना- हुसेन सय्यद, विजय घुगे यांच्या पथकाने केली आहे. स्था.गु.शा. च्या या कारवाई बद्दल . पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.

No comments