चोरीच्या मोटारसायकलसह संशयीत ताब्यातउस्मानाबाद : गोपनीय माहितीच्या आधारे स्था.गु.शा. च्या पथकाने संशयीत ईश्वर सुरेश काळे, वय 22 वर्षे, रा खर्डा, ता. जामखेड, जि. अहमदनगर यास दि. 14.07.2020 रोजी परंडा तालुक्यातून ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातून एक होंडा सुपर स्प्लेंडर मोटारसायकल जप्त केली. मो.सा. ची मालकी- ताबा या विषयी त्याने समाधानकारक उत्तरे न दिल्याने पथकाने त्या मो.सा. च्या चासी- इंजीन क्रमांकावरुन माहिती काढली असता सदर मो.सा. बाबत जामखेड पोलीस ठाणे, येथे गु.र.क्र. 288/2020 हा चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे समजले. उर्वरीत तपासकामी नमूद संशयीतास पो.ठा. आंबी यांच्या ताब्यात देण्यात आले असुन उर्वरीत तपासकामी अहमदनगर पोलीसांची मदत घेतली जाणार आहे.

            ही कारवाई स्था.गु.शा. चे पो.नि. श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखालील पोहेकॉ- काझी, पोना- शेळके, कुनाल दहीहांडे, पोकॉ- आरसेवाड यांच्या पथकाने केली आहे. 

मनाई आदेशांचे उल्लंघन 124 पोलीस कारवायांत 26,000/-रु. दंड वसुल

उस्मानाबाद कोविड- 19 संबंधी प्रशासनाने काढलेल्या मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द उस्मानाबाद पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व इतर शाखां मार्फत दि.14.07.2020 रोजी खालील दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.
1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: 104 कारवायांत- 20,800/- रु. दंड प्राप्त झाला आहे.
2)सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे: 1 कारवाईत- 500/-रु. दंड प्राप्त झाला आहे.
3)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: सोशल डिस्टन्सींग टाळुन दुकाना समोर गर्दी निर्माण केली इत्यादी प्रकरणांत 16 कारवायांत 3,200/-रु. दंड प्राप्त झाला आहे.

4)कार- मोटारसायकलवर जादा प्रवासी बसवणे: लॉकडाउन काळात मोटारवाहनांतील प्रवासी मर्यादेचे उल्लंघन केल्या प्रकरणी 3 कारवायांत 1,500/- रु. दंड प्राप्त झाला आहे.

No comments