उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या पत्नी कोरोना पॉझिटिव्ह

गडाख स्वतः होम क्वारंटाईनउस्मानाबाद / नगर : उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या पत्नी कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे स्वतः  गडाख होम क्वारंटाईन झाले आहेत. यामुळे गडाख यांचा उस्मानाबाद संभाव्य दौरा लांबणीवर पडणार आहे.

मृद व जल संधारण मंत्री तथा उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या पत्नी माजी पंचायत समिती सभापती सुनीताताई गडाख यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. स्वतः गडाख यांनी हि माहिती फेसबुकवर पोस्ट करून दिली “काल दि 17जुलै रोजी माझी पत्नी यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून आज शनिवारी दि 18 जुलैला माझा स्त्राव दिलेला आहे . त्यामुळे मी स्वतः होम क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे . आपणही आपल्यासह कुटूंबियांची काळजी घ्या.घरी रहा, सुरक्षित रहा…” असे गडाख यांनी म्हटले आहे.

उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख हे २६ मे नंतर उस्मानाबादला फिरकले नाहीत, त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री पाहिजेत, पालकमंत्री हरवले आहेत, अशी  पोस्टरबाजी केली  होती. त्यानंतर गडाख यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले होते. 

No comments