कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात ७ जुलै रोजी सतरा रुग्णाची भरउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोनाने कहर माजवला आहे. मंगळवारी  सोळा जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील आणखी एक रुग्ण लातूर येथे ऍडमिट आहे. त्यामुळे एकूण १७ कोरोना रुग्णाची एकाच दिवशी भर पडली आहे.उस्मानाबाद जिल्हा सामान्य रुग्णालयातून मंगळवार दि. ७ जुलै रोजी एकूण ८४ स्वाबचे नमुने तपासणीसाठी लातूर येथे पाठवण्यात आले होते. पैकी १६ पॉजिटीव्ह, ४ अनिर्णित, ३ रद्द आणि ६१ निगेटिव्ह असा रिपोर्ट प्राप्त झाला आहे.

१६ पॉजिटीव्ह रुग्णामध्ये भूम तालुक्यातील दहा , उस्मानाबाद तालुक्यातील ६  आणि उमरगा  तालुक्यातील १ असा समावेश आहे.पॉजिटीव्ह रुग्ण पुढीलप्रमाणे - 

भूम तालुका 

भूम  तालुक्यातील १० पैकी एक रुग्ण  भूम शहरातील आणि बाकी ९ रुग्ण राळे सांगवी येथील असून ते एकाच कुटुंबातील आहेत. सर्व रुग्ण पूर्वीच्या पॉजिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील आहेत.

उस्मानाबाद तालुका 

उस्मानाबाद  तालुक्यातील  सहा पैकी पाच रुग्ण उस्मानाबाद शहरातील असून, एक रुग्ण  कनगरा येथील आहे.
 उस्मानाबाद शहरातील पाच पैकी दोन रुग्ण झोरे गल्ली, दोन रुग्ण समता कॉलनी, एक रुग्ण राम नगर मधील आहे.उमरगा तालुका 
उमरगा तालुक्यातील  एक रुग्ण माडज गावातील आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण - ३११
बरे झालेले रुग्ण - २००
मृत्यू - १४
ऍक्टिव्ह रुग्ण - ९७

समता काॅलनी मधे कोरोना पाॅजिटिव्ह च्या ज्या बातम्या आल्या आहेत त्या पूर्णसत्य नाहीत.ते पेशंट समता काॅलनी चे रहिवासी नसून गावातील इतर ठिकाणी राहणारे आहेत.त्यांचे दुकान फक्त समता काॅलनी मधे माॅडर्ण बेकरी समोर असल्यामुळे उल्लेख समता काॅलनी असा आलेला आहे. हे फक्त आपल्या माहितीस्तव... परंतु तरीही आपण सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे...मास्क, सॅनिटायजेशन, सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक आहे...

   - युवराज नळे (बप्पा)
      सौ.सुनिता साळुंके

1 comment

Unknown said...

I am not interested