कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात ६ जुलै रोजी आठ पॉजिटीव्ह

 
कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात ६ जुलै रोजी आठ पॉजिटीव्ह


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यतील आठ जणांचा कोरोना रिपोर्ट सोमवारी पॉजिटीव्ह आला आहे. त्यात  उमरगा तालुक्यातील तीन, परंडा तालुक्यातील दोन, तुळजापूर शहरातील दोन आणि उस्मानाबाद तालुक्यातील एक असा समावेश आहे.


६ जुलै ( सोमवार ) रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 98 नमुने  तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते व पूर्वीचे 7 पेंडिंग असे एकूण 105 रिपोर्ट्स प्राप्त झाले असून आठ   पॉजिटीव्ह , 11 अनिर्णित 5 रिजेक्ट व  81 अनिर्णित रिपोर्ट प्राप्त झाला आहे.

पॉजिटीव्ह रुग्ण असे 



दोन रुग्ण  आवार पिंपरी ता परांडा  येथील आहेत ( पूर्वीच्या पॉजिटीव्ह  रुग्णाच्या संपर्कातील आहेत)

दोन रुग्ण तुळजापूर येथील आहेत.

रुग्ण रुग्ण उमरगा तालुक्यातीळ  असून     त्यातील एक  रुग्ण कसगी येथील व दोन उमरगा शहरातील  आहेत ( ते पूर्वीच्या पॉजिटीव्ह रुग्णाच्या  संपर्कातील आहेत .

एक रुग्ण  इर्ला   ता उस्मानाबाद येथील आहे ( पूर्वीच्या पॉजिटीव्ह रुग्णाच्या  संपर्कातील आहे



  •  एकूण कोरोना बाधित रुग्ण - २९६
  • बरे झालेले रुग्ण - १९८
  • मृत्यू  - १४
  • एक्टीव्ह रुग्ण - ८४



From around the web