कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी सहा पॉजिटीव्हउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील आणखी सहा जणांचा कोरोना  रिपोर्ट पॉजिटीव्ह आल्याने दिवसभरात 20 रुग्णाची भर पडली आहे.त्यात उमरगा तालुक्यातील 13, उस्मानाबाद तालुक्यातील दोन, तुळजापूर तालुक्यातील एक, भूम तालुक्यातील 3 असा समावेश आहे.उस्मानाबाद  जिल्ह्यतील कळंब तालुक्यातील उपळाई येथील एक रुग्ण सोलापूर येथे पॉजिटीव्ह आल्याने उस्मानाबाद  जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आला आहे, तो सध्या सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. तसेच दोन रुग्ण उमरगा येथील असून ते लातूर येथे पॉजिटीव्ह आले असून ते शा. वै. म. लातूर येथे उपचार घेत आहेत, ते पूर्वीच्या पॉजिटीव्ह पेशंट च्या संपर्कातील आहेत. त्यामुळे उस्मानाबाद  जिल्ह्यात 20 रुग्णांची बाधितांमध्ये भर पडली आहे. 

४ जुलै रोजी  सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 157 नमुने  तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, त्यापैकी 2 पॉजिटीव्ह, 138 नेगेटिव्ह, व 17 पेंडिंग असा रिपोर्ट प्राप्त  झाला होता.त्यातील ११ जण पॉजिटीव्ह आले आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यात बारा पॉजिटीव्हतसेच ५ जुलै रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून १३७ नमुने  तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, त्यापैकी ६ पॉजिटीव्ह, ८८ नेगेटिव्ह, व ३८ पेंडिंग, २ अनिर्णित  असा रिपोर्ट प्राप्त  झाला आहे.

पॉजिटीव्ह रुग्णाची माहिती पुढील प्रमाणे आहे. 

तेरा  रुग्ण  उमरगा तालुक्यातील आहेत, त्यापैकी तीन गुंजोटी, तीन नागराळ, दोन जहागीर चिंचोली व पाच रुग्ण  प्रॉपर उमरगा येथील आहेत, त्यापैकी दोन शा. वै. म. लातूर येथे उपचार घेत आहेत.

दोन रुग्ण उस्मानाबाद तालुक्यातील असून, एक झोरे गल्ली उस्मानाबाद येथील व दुसरा इर्ला ता. उस्मानाबाद येथील आहे.

एक रुग्ण  तुळजापूर तालुक्यातील असून तो धोत्री या गावाचा आहे.

तीन रुग्ण  हे भूम तालुक्यातील असून दोन लक्षमी नगर भूम व एक पेशंट राळे सांगवी ता. भूम येथील आहे.

संस्था निहाय उपचार घेत असलेल्या रुग्णांची माहिती. 
सा. रु. उस्मानाबाद -13.
शा. आयुर्वेदिक. म. उस्मानाबाद -12.
उप. जि. रु. तुळजापूर -20.
विजय क्लीनिक (DCHC)उमरगा -07.
शेंडगे हॉस्पिटल (DCHC)उमरगा) -02.
उप. जि. रुग्णालय, उमरगा -08.
कोरोना केयर सेंटर कळंब -10.
शा. वै. म. लातूर -05.
पुणे -01.
सोलापूर -04.
बार्शी -01.
असे एकूण -83.

एकूण बाधित रुग्ण -  २८८, बरे झालेले रुग्ण - १९१, मृत्यू  -   १४, ऍक्टिव्ह रुग्ण - ८३

No comments