Header Ads

उस्‍मानाबाद ते तुळजापूर या राष्‍ट्रीय महामार्गावर रस्‍त्‍याच्‍या दुतर्फा वटवृक्षाचे वृक्षारोपण

      

उस्मानाबाद - जिल्‍ह्यामध्‍ये उस्‍मानाबाद ते तुळजापुर दरम्‍यान रस्‍त्याच्या दुतर्फा पूर्वापार पासूनचे जुन्या वटवृक्षांच्या झाडाचा ऐतिहासिक वारसा लाभला होता. मौ.वडगांव (सि) या गावाला ओळखसुध्‍दा वटवृक्षामुळे लाभली होती. माञ राष्‍ट्रीय महामार्गाच्‍या कामामध्‍ये हे वटवृक्ष काढावे लागले होते. 

       उस्‍मानाबाद जिल्‍ह्याला वटवृक्षाचे गतवैभव पुन्‍हा प्राप्‍त करुन देण्‍याच्‍या संकल्‍पनेतून उस्‍मानाबाद जिल्‍ह्याच्‍या जिल्‍हाधिकारी  दीपा मुधोळ-मुंडे यांनी उस्‍मानाबाद ते तुळजापूर राष्‍ट्रीय महामार्ग क्रमांक 211 च्या रस्‍त्‍याच्‍या दुतर्फा श्रमदानातुन वटवृक्ष लागवड मोहीम समोर आली. राष्‍ट्रीय महामार्गा लगत एवढया मोठया प्रमाणात वटवृक्ष लागवड करणे ही संकल्‍पना सर्व राज्‍यासाठी व देशासाठी  वनाच्‍छादन वाढवण्‍यासाठी प्रेरक ठरणारी आहे.

           या मोहिमेला मूर्त स्‍वरुप देण्‍यासाठी  दिनांक 1 जुलै 2020 ते 15 जुलै 2020 या वृक्ष लागवड पंधरवाड्याचे औचित्‍य साधून दिनांक 1 जुलै 2020 रोजी जिल्‍हाधिकारी        दीपा मुधोळ-मुंडे  यांच्‍या संकल्‍पनेतून उस्‍मानाबाद ते तुळजापूर या राष्‍ट्रीय महामार्गावरील रस्‍त्‍याच्‍या दुतर्फा बाजूने वटवृक्षाचे वृक्षारोपण करुन वृक्ष लागवड पंधरवाडा  साजरा करण्‍यात आला. यामध्‍ये एकूण सहा पथकांच्‍या मदतीने विद्यामाता हायस्‍कूल, सांजा रोड पासून बोरी, तुळजापूर दरम्‍यान महसूल विभाग व राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्‍त विद्यमाने 1587 रोपांचे वृक्षारोपण करण्‍यात आले.

        यामध्‍ये उस्‍मानाबाद ते तुळजापुर राष्‍ट्रीय महामार्गाच्‍या डाव्‍या बाजूला 391 व उजव्‍या बाजूला 887 असे एकूण 1278  वटवृक्षांची  तसेच राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्‍या कावलदरा येथील जागेत 309 फळझाडे व इतर झाडे असे एकूण 1587 झाडांचे वृक्षारोपण करण्‍यात आले. या झाडांमध्‍ये 1282 वटवृक्ष, 100 आंबा, 105 जांभूळ, 100 बांबूच्या झाडांचा समावेश आहे.

          या मोहिमेमध्‍ये जिल्‍हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांच्‍या नेतृत्‍वाखाली तहसील कार्यालय, उस्मानाबाद व तुळजापूर, उपविभागीय अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद, जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद, वनविभाग, उस्मानाबाद तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सोलापूर आय.आर.बी कंपनीचे एकूण 350 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या मोहिमेमध्‍ये सहभाग नोंदवला.   
                
           या कार्यक्रमास विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी रामेश्‍वर रोडगे, तहसीलदार उस्मानाबाद व तुळजापूर, वन विभागाचे उपसंचालक श्री. गायकर विभागीय वन आधिकारी श्री.बेडके , वनपरिक्षेञ अधिकारी  श्री.पवार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे श्री.विपाट, प्रकल्‍प संचालक संजय कदम , आय.आर.बी चे प्रकल्‍प संचालक श्री. गडीकर यांची याप्रसंगी उपस्थिती होती .

       यावेळी विभागीय आयुक्त श्री. केंद्रेकर यांच्या हस्ते कावलदरा, कुष्‍ठधाम उस्‍मानाबाद  व भक्त निवास, तुळजापूर येथे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच कुष्ठधाम नजीक श्रमदानातून मागील वर्षी लावण्यात आलेल्या ठिकाणी तसेच त्याच परिसरात लावण्यात आलेल्या मियावाकी  व घनवन परिसराला भेट दिली  व श्रमदानातून केलेल्‍या कामांचे समाधान व्‍यक्‍त केले.

No comments