विनापरवाना धार्मीक / विवाह सोहळ्याचे आयोजन पोलीसांतर्फे गुन्हे दाखल
उस्मानाबाद-  कोविड- 19 रोगाच्या संक्रमनास आळा बसावा यासाठी शासन तसेच जिल्हा प्रशासन यांनी विवाह, अन्य कार्यक्रमाच्या आयोजनासाठी तसेच दुकाने, आस्थापना चालू ठेवण्यासाठी विविध मनाई आदेश जारी केले आहेत. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द पोलीस प्रशासना तर्फे भा.दं.सं. कलम- 188, 269 सह महाराष्ट्र कोविड- 19 उपाय योजना नियम- 11 सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये संबंधीत पो.ठा. येथे स्वतंत्र 3 गुन्हे खालील प्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.


1) कळंब येथील पारधी वस्तीत राहणाऱ्या 1)राजा शामराव काळे 2)कमलाबाई राजा काळे 3)बाळासाहेब जगदीश सोनवणे, यांनी राजा काळे यांच्या घरासमोर दि. 19.07.2020 रोजी 13.20 वा. सु. विनापरवाना धार्मिक कार्यक्रम आयोजीत करुन, गर्दी जमवून कार्यक्रमातील व्यक्तींत सुरक्षीत अंतर न ठेवता, नाका- तोंडास मास्‍क न लावता कोविड- 19 संसर्गाची शक्यता निर्माण करण्याची घातक कृती केली.


2) कोविड- 19 संसर्गास प्रतिबंध व्हावा या उद्देशाने शासनाच्या आदेशाने विवाह सोहळ्यास सामाजीक अंतर ठेउन, नाका- तोंडास मास्क लाउन 50 व्यक्तींना परवाणगी आहे. असे असतांनाही गुलाब नृसींग भोसले यशोदा गुलाब भोसले, दोघे रा. कवठा, ता. उमरगा या पती- पत्नींनी दि. 14.07.2020 रोजी 11.30 वा. सु. कवठा येथे कोविड- 19 संसर्गाच्या अनुशंगाने कोनतीही खबरदारी न बाळगता विवाह सोहळ्यात 50 पेक्षा जास्त व्यक्तीना एकत्र जमवले. यावरुन त्यांच्यासह संबंधीत मंगल कार्यालय व्यवथापक- चनबस रामशेट्टी मलंग यांच्या विरुध्द पोलीसांतर्फे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


3) रुक्मीणी नंदु लोंढे, रा. उस्मानाबाद यांनी दि. 19.07.2020 रोजी 18.30 वा. सु. उस्मानाबाद येथील ज्ञानेश्वर मंदीर रस्त्यालगत कोविड- 19 संसर्गाच्या अनुशंगाने कोणत्याही प्रकारची खबरदारी नघेता, नाका- तोडांस मास्क न लावता भाजी विक्री करत असतांना पो.ठा. आनंदनगर च्या पथकास आढळल्या. यावरुन त्यांच्या विरुध्द पोलीसांतर्फे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

No comments