ढोकी: मद्यधुंद अवस्थेत सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्यावर गुन्हा दाखल
 ढोकी: विजय बबन सोनटक्के, रा. तडवळे (क.), ता. उस्मानाबाद याने दि. 13.07.2020 रोजी 19.30 वा. सु. मौजे ढोकी येथील रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत मोठमोठ्याने आरडा- ओरड, शिवीगाळ करुन सार्वजनिक शांततेचा भंग केला. यावरुन पो.ठा. ढोकी चे पोकॉ- नितीन कोतवाड यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन विजय सोनटक्के याच्याविरुध्द म.दा.का. कलम- 85 (1) सह म.पो.का. कलम- 110,112 / 117 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


जुगार प्रतिबंधक कारवाया
पो.ठा., उमरगा: वैजीनाथ त्रिंबक फुकटे, रा. बालाजीनगर, उमरगा हा दि. 13.07.2020 रोजी चाटे कॉम्प्लेक्स, उमरगा समोर कल्याण मटका जुगाराचे साहित्य व रोख रक्कम 900/-रु. सह तर, दुसऱ्या घटनेत ईस्माईल हनमंत कांबळे, रा. तुरोरी, ता. उमरगा हा आज दि. 14.07.2020 रोजी तुरोरी येथील प्रतीक्षा हॉटेल समोर कल्याण मटका जुगाराच्या साहित्य व रोख रक्कम 920/-रु. सह पो.ठा. उमरगा यांच्या पथकास आढळले. यावरुन त्यांच्याविरुध्द पो.ठा. उमरगा येथे 2 स्वतंत्र गुन्हे दि. 13 व 14.07.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

No comments