Header Ads

कंटेन्मेंट झोन मध्ये प्रवेश करणाऱ्यावर पोलीसांतर्फे गुन्हा दाखल
उस्मानाबाद -  उस्मानाबाद शहरातील काळा मारुती चौक परिसरात कोरोना रुग्ण आढुन आल्याने तो परिसर प्रशासनाद्वारे कंटेन्टमेंट झोन घोषीत करण्यात आला आहे. पो.ठा. उस्मानाबाद (श.) चे पोना- सायलु बिरमवार हे नगरपरिषदेच्या मदतीने दि. 09.07.2020 रोजी कंटेन्टमेंट झोन परिसरात लाकडी अडथळे (बॅरिकेड्स) उभारत होते. यावेळी लखन सतिश ओव्हळ, रा. उस्मानाबाद यांनी त्या ठिकाणाहुन पुढे जायचे असल्याचे सांगीतले. त्यावर बिरमवार यांनी सदर भाग हा कंटेन्मेंट झोन म्हणुन घोषीत केला असुन दुसऱ्या मार्गाने जाण्यास सुचविले. त्यावर नमूद व्यक्तीने बिरमवार यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करुन कंटेन्मेंट झोन मध्ये प्रवेश केला. यावरुन पोना- बिरमवार यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन लखन ओव्हळ यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 188 सह, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना नियम- 11 अन्वये गुन्हा दि. 09.07.2020 रोजी नोंदवला आहे.कोविड- 19: नाकाबंदी दरम्यान 542 कारवाया- 1,01,600 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त

 कोविड- 19 च्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने जमावबंदी व विविध मनाई आदेश लागू आहेत. असे असतांनाही काही उपद्रवी लोक त्या आदेशांचे उल्लंघन करत असतात. त्यांना पायबंद व्हावा या उद्देशाने जिल्ह्यातील 18 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत महत्वाच्या रस्त्यांवर दररोज नाकाबंदी केली जात आहे. नाकाबंदी दरम्यान कायदा- मनाई आदेशांचे, मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने दि. 09.07.2020 रोजी उस्मानाबाद जिल्हयातील 18 पोलीस ठाणी व शहर वाहतुक शाखा यांनी दि. 09/07/2020 रोजी 542 कारवाया करुन 1,01,600 ₹ ‘तडजोड शुल्क’ वसूल केले आहे.


मनाई आदेशांचे उल्लंघन 190 पोलीस कारवायांत 57,800/-रु. दंड वसुल

 कोविड- 19 संबंधी प्रशासनाने काढलेल्या मनाई आदेशांचे उल्लंघन केल्यास दंड वसुलीचा मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष- आपत्ती निवारण प्राधिकरण यांचा आदेश आहे. त्यास अनुसरून उस्मानाबाद पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व इतर शाखां मार्फत दि. 09.07.2020 रोजी खालील मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.
1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: 109 कारवायांत- 21,800/- रु. दंड प्राप्त झाला आहे.
2)सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे: 2 कारवायांत- 1,000/-रु. दंड प्राप्त झाला आहे.
3)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: सोशल डिस्टन्सींग टाळुन दुकाना समोर गर्दी निर्माण केली इत्यादी प्रकरणांत 3 कारवायांत 600/-रु. दंड प्राप्त झाला आहे.

4)कार- मोटारसायकलवर जादा प्रवासी बसवणे: लॉकडाउन काळात मोटारवाहनांतील प्रवासी मर्यादेचे उल्लंघन केल्या प्रकरणी 76 कारवायांत 34,400/- रु. दंड प्राप्त झाला आहे.


No comments