दोन रस्ते अपघात, 3 पुरुष मयतपोलीस ठाणे, नळदुर्ग: 1)उल्हास रमेश सोमवंशी, वय 30 वर्षे 2) सागर धनराज पाटील, वय 27 वर्षे, दोघे रा. आष्टा कासार, ता. लोहारा हे दोघे दि. 24.06.2020 रोजी 18.30 वा. सु. नळदुर्ग येथील आलियाबाद पुला जवळ राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वर मोटारसायकल क्र. एम.एच. 20 बीपी 3381 ने प्रवास करत होते. दरम्यान ट्रक क्र. एम.एच. 25 यु 4045 च्या अज्ञात चालकाने ट्रक विरुध्द दिशेने निष्काळजीपणे, हयगईने चालवून उल्हास सोमवंशी चालवत असलेल्या नमूद मो.सा. ला समोरुन जोराची धडक दिली. या अपघातात उल्हास सोमवंशी यांसह पाठीमागील सागर पाटील हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अपघातानंतर जखमीस वैद्यकीय उपचाराची तजबीज न करता, अपघाताची खबर पोलीसांना न देता नमूद ट्रक चा अज्ञात चालक घटनास्थळावरुन ट्रकसह पळून गेला. अशा मजकुराच्या उमेश शिवराम सोमवंशी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन संबंधीत ट्रक चालकविरुध्द भा.दं.वि. कलम- 279, 304 (अ), 237, 238 सह मो.वा.का. कलम- 134 (अ) (ब), 184 अन्वये गुन्हा दि. 01.07.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, आनंदनगर: उत्तरेश्वर मधुकर शिंदे, वय 58 वर्षे, रा. शिंगोली, ता. उस्मानाबाद हे दि. 26.06.2020 रोजी 01.00 वा. सु. मौजे शिंगोली शिवारातील रस्त्याने पायी चालत जात होते. यावेळी गावातीलच- विशाल बाळू मगर याने मोटारसायकल क्र. एम.एच. 26 बीजे 7538 ही निष्काळजीपणे, हयगईने चालवून उत्तरेश्वर शिंदे यांना जोराची धडक दिली. या अपघातात उत्तरेश्वर शिंदे हे गंभीर जखमी झाल्याने दि. 27.06.2020 रोजी 01.30 वा. वैद्यकीय उपचारादरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या विश्वास उत्तरेश्वर शिंदे (मयताचा मुलगा) यांच्या प्रथम खबरेवरुन नमूद आरोपीविरुध्द गुन्हा दि. 01.07.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments