Header Ads

मनाई आदेश झुगारुन पानटपरी, दुकान व्यवसायास चालु ठेवणाऱ्यांवर 3 गुन्हे दाखलउस्मानाबाद- कोविड- 19 रोगाच्या संक्रमनास आळा बसावा यासाठी मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आठवड्यातील शनिवार हा दिवस जनता कफ्यु पाळण्याचे आदेश आहेत. असे असतांनाही त्या मनाई आदेशांचे उल्लंघन करुन दि. 11.07.2020 रोजी 11.30 ते 11.45 वा. चे दरम्यान 1)पठाण महेबुब खान, रा. खाजानगर, उस्मानाबाद यांनी खाजानगर येथे ‘केजीएन पान शॉप’ व्यवसायास चालू ठेवले तर, 2)तानाजी वसंत जठार, रा. गणेशनगर, उस्मानाबाद यांनी त्याचे ‘भवानी मटन शॉप’ व्यवसायास चालू ठेवले.
            तर 3)महेबुब अत्तार शेख, रा. उमरगा यांनी आज दि. 12.07.2020 रोजी उमरगा न्यायालया समोर तंबाखुजन्य पदार्थांच्या विक्रीसाठी पानटपरी चालू ठेवली. यावरुन पोलीसांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन वरील तीघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 188, 269 सह, महाराष्ट्र कोविड- 19 अपाय योजना नियम- 11 सह, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये संबंधीत पो.ठा. येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

जुगार प्रतिबंधक कारवाई

 मुरुम: 1)मशायक महेबुब जेवळे 2)श्रावण शंकर ओमशेट्टी 3)येलाप्पा बसाप्पा मासुडे, तीघे रा. आलुर, ता. उमरगा हे तीघे दि. 11.07.2020 रोजी गावातीलच आक्कामा देवी मंदीरा समोर पप्पु पेईंग सुरट जुगार खेळत असतांना जुगाराच्या साहित्यासह रोख रक्कम 2,740/-रु. च्या मालासह पो.ठा. मुरुम च्या पथकास आढळुन आले. यावरुन नमुद तीघांविरुध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


अवैध मद्य प्रतिबंधक कारवाया

नळदुर्ग: शालुबाई महादेव राठोड, रा. निलेगांव तांडा, ता. तुळजापूर या दि. 11.07.2020 रोजी मौजे निलेगांव तांडा शिवारात दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने 10 ली. गावठी दारु (किं.अं.600/-रु.) कब्जात बाळगल्या असतांना पो.ठा. नळदुर्ग यांच्या पथकास आढळल्या.

येरमाळा: लताबाई बालाजी काळे, रा. चोराखळी, ता. कळंब या दि. 12.07.2020 रोजी मौजे चोराखळी शिवारातील एका पत्रा शेडमध्ये दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने 35ली. गावठी दारु व देशी दारुच्या 8 बाटल्या (एकुण किं.अं.2,860/-रु.) कब्जात बाळगल्या असतांना स्थानिक गुन्हे शाखा च्या पथकास आढळल्या.

 उमरगा: व्यंकट श्रीधर सगर, रा. काळा लिंबाळा, ता. उमरगा हा दि. 12.07.2020 रोजी मौजे बलसुर, ता. उमरगा येथील आपल्या शेातातील शेड समोर दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने 18 ली. गावठी दारु (किं.अं.950/-रु.) कब्जात बाळगला असतांना पो.ठा. उमरगा यांच्या पथकास आढळला.

No comments