Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे दोन आणि मारहाणीचा एक गुन्हा दाखल  तामलवाडी: बाबुराव बब्रुवान धंदुरे, रा. सिंदफळ, ता. तुळजापूर यांच्या मौजे सांगवी (काटी) येथील दुकानाचे कुलूप दि. 10.07.2020 रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने तोडून दुकानातील मो.सा. चे चाके (टायर) 21 नग व ट्युब 50 नग राल्को कंपनीचे असा एकुण 34,350/-रु. चा माल चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या बाबुराव धंदुरे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 11.07.2020 रोजी नोंदवला आहे.


 ढोकी: भास्कर विश्वंभर टेकाळे, रा. कोल्हेगाव, ता. उस्मानाबाद यांनी दि. 09.07.2020 रोजी रात्री 21.00 वा. सु. त्यांच्या घरालगत असलेल्या गोठ्यात मुर्रा जातीची म्हैस (किं.अं. 80,000/-रु.) बांधली होती. ती दुसऱ्या दिवशी त्यांना गोठ्यात बांधल्या ठिकाणी आढळली नाही. यावरुन ती अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या भास्कर टेकाळे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोट्याविरुध्द गुन्हा दि. 12.07.2020 रोजी नोंदवला आहे. मारहाण

मुरुम:   कोराळ, ता. उमरगा येथील चोपडे कुटूंबीयांतील अंकुश विश्वनाथ चोपडे, ओंकार, हरीदास, पांडुरंग, बळीराम, सविता, जनाबाई चोपडे यांच्या गटाचा गावातीलच आपले चोपडे कुटूंबीय भाऊबंद- मनोहर, विजयकुमार, ओम, आकाश, लक्ष्मण, मंगलबाई, छायाबाई, मनिषा यांच्या गटाशी दि. 10.07.2020 रोजी 18.00 वा. सु. सामाईक शेत बांधावर पेरणीच्या कारणावरुन संघर्ष झाला. यात दोन्ही गटांनी बेकायदेशीर जमाव जमवून परस्परांस शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, कोयता, दगड- काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले.

No comments