उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखल
पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): राणी आळंदे, रा. उस्मानाबाद या आपल्या दोन मुलांसह दि. 25.07.2020 रोजी राहत्या घरी होत्या. यावेळी कॉलनीतीलच बालाजी सुर्यवंशी यांनी आपल्या विरुध्द ची तक्रार मागे घेण्याच्या कारणावरुन राणी आळंदे यांना शिवीगाळ करुन, जिवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्या घरावर दगड फेकून आर्थिक नुकसान केले. अशा मजकुराच्या राणी आळंदे यांच्या प्रथम खबरेवरुन बालाजी सुर्यवंशी यांच्याविरुध्द गुन्हा‍ दि. 26.07.2020 रोजी नोंदवला आहे.


पोलीस ठाणे, लोहारा: मौजे चिंचोली येथील करदोरे कुटूंबातील सदस्य- शंकर, ज्ञानेश्वर, अमोल, सागर, मोहन अशा 5 जणांनी दि. 17.07.2020 रोजी 14.30 वा. मौजे चिंचोली शेत शिवारात बेकायदेशीर जमाव जमवून सामाईक बांधावरील रहदारीच्या कारणावरुन सुनिल बळीराम पवार, रा. माकणी, ता. लोहारा यांसह त्यांचा भाऊ- दिलीप पवार, पुतण्या- आकाश पवार अशा तीघांना शिवीगाळ केली. तसेच कुऱ्हाडीच्या तुंब्याने, काठीने मारहाण करुन जखमी केले व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सुनिल पवार यांच्या फिर्यादीवरुन नमूद 5 व्यक्तींविरुध्द गुन्हा दि. 26.07.2020 रोजी नोंदवला आहे.


 “अपघात.
पोलीस ठाणे, नळदुर्ग: वसंत निवृत्तीराव कदम, वय 70 वर्षे, रा. मुर्टा, ता. तुळजापूर हे दि. 25.07.2020 रोजी 18.45 वा. सु. नळदुर्ग येथे राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वरील अतिथी लॉज समोर मोटारसायकल चालवत जात होते. दरम्यान मारुती अरुण पाटील, रा. बटाण, ता मंगळवेढा यांनी पिकअप वाहन क्र. एम.एच. 13 सीयु 7445 हा निष्काळजीपणे, हयगईने चालवून वसंत कदम चालवत असलेल्या मो.सा. ला धडक दिली. यात वसंत कदम हे गंभीर जखमी होउन त्यांच्या मो.सा. चे आर्थिक नुकसान झाले आहे. अपघातानंतर पिकअप चालक घटनास्थळावरुन निघुन गेला. अशा मजकुराच्या वसंत कदम यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन नमूद चालका विरुध्द गुन्हा दि. 26.07.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments