उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे चार गुन्हे दाखल बेंबळी: नंदकिशोर मधुकर हजारे, रा. टाकळी (बें.), ता. उस्मानाबाद यांसह वडील- मधुकर हजारे असे दोघे दि. 17.06.2020 रोजी मौजे टाकळी (बे.) येथील आपल्या शेतात होते. यावेळी शेतशेजारी अंगद माने, हनुमंत माने, बालाजी माने, राजाराम माने या चौघांनी त्यांच्या शेतात पेरणी करत मधुकर हजारे यांच्या शेतात पेरणीचे काही तास घातले. याबाबत मधुकर हजारे व नंदकिशोर या दोघांनी नमूद चौघांना विचारणा केली असता त्यांनी नमूद दोघा पिता- पुत्रांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या नंदकिशोर हजारे यांच्या फिर्यादीवरुन नमूद चौघांविरुध्द गुन्हा दि. 14.07.2020 रोजी नोंदवला आहे.


 येरमाळा: श्रीमती अंजू आदेश कांबळे, वय 25 वर्षे, रा. येरमाळा, ता. कळंब या दि. 15.07.2020 रोजी माहेरी मौजे वडजी येथे आई- वडीलांच्या घरी झोपलेल्या होत्या. पहाटे 05.30 वा. सु. त्यांचा पती आदेश दत्तात्रय कांबळे याने त्या राहत असलेल्या घराच्या दरवाजावर लाथा मारुन दार उघडण्यास त्यांना भाग पाडले. घरात येउन आदेश याने पत्नी- अंजू हिच्यासह तीच्या आई- वडीलांस शिवीगाळ करुन मारहाण सुरु केली. पत्नी- अंजू हीस तुला आता खल्लास करतो. असे धमकावून त्याने सत्तुर हे शस्त्र तीच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या श्रीमती अंजू कांबळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पती- आदेश कांबळे याच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 307, 323, 504 सह भा.ह.का. कलम- 4, 25 अन्वये दि. 15.07.2020 रोजी गुन्हा नोंदवला आहे.


 लोहारा: आकाश वामन चिमुकले, रा. सास्तुर, ता. लोहारा हे दि. 14.07.2020 रोजी आपल्या घरा जवळ थांबले होते. यावेळी गावातील घोडेसवार कुटूंबातील- इरशाद, सलमान, इमरान उर्फ इमाम या तीघांनी पुर्वीच्या वादावरुन आकाश यांना जातीवाचक शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, धारदार शस्त्राने मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या आकाश चिमुकले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नमूद तीघांविरुध्द भा.दं.सं. व ॲट्रॉसीटी कायदा अंतर्गत गुन्हा दि. 15.07.2020 रोजी नोंदवला आहे.


उस्मानाबाद (ग्रा.): उमेश उत्तम होवाळ, वय 38 वर्षे, रा. येडशी, ता. उस्मानाबाद यांचा दि. 07.07.2020 रोजी मृत्यु झाला होता. त्या संबंधी अकस्मात मृत्यु क्र. 35/2020 नोंदवून चौकशी सुरु होती. मौजे बदलापूर, ता. अंबाजोगाई येथील शेख कुटूंबातील- नसरीना हिच्यासह तीची आई, भाऊ, चुलता यांनी सन- 2018 च्या रामलींग यात्रेपासून वेळोवेळी उमेश होवाळ यांना पैशांसाठी ब्लॅकमेल करुन त्यांचा छळ केला. या छळास कंटाळून उमेश यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराचे निवेदन मयताचा भाऊ- जितेंद्र उत्तम होवाळ यांनी चौकशी दरम्यान पोलीसांत दिल्याने नमूद चौघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 306, 384, 385, 506, 34 सह ॲट्रॉसीटी कायदा अंतर्गत गुन्हा दि. 15.07.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments