उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल
पोलीस ठाणे, कळंब: रशील अल्लाबक्श शेख, रा. अरब कॉलनी, डिकसळ, ता. कळंब यांनी आपली हिरो होंडा एसएस मो.सा. क्र. एम.एच. 21 बी 6732 ही दि. 24.07.2020 रोजी मध्यरात्री राहत्या घरा समोर लावली होती. ती त्यांना दुसऱ्या दिवशी लावल्या जागी आढळली नाही. यावरुन ती अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या रशील शेख यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 26.07.2020 रोजी नोंदवला आहे.


पोलीस ठाणे, वाशी: गोपाल मदन कारकर, रा. अंजनसोंडा, ता. भुम यांच्या राहत्या राहत्या घरातील 7 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, एक एल.ई.डी. टीव्ही व मोबाईल फोन चा चार्जर असा एकुण 35,500/-रु. चा माल दि. 27.07.2020 रोजी रात्री 03.00 वा. सु. अज्ञात चोरट्याने चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या गोपाल कारकर यांच्या‍ फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 27.07.2020 रोजी नोंदवला आहे.अवैध मद्य प्रतिबंधक कारवाई

पो.ठा., मुरुम: सागर मल्लीनाथ चौधरी, रा. चिंचोली (भु.), ता. उमरगा हा दि. 26.07.2020 रोजी आपल्या राहत्या घरा समोर दारुचा अवैध विक्री व्यवसाय करत असतांना पो.ठा. मुरुम च्या पथकास आढळला. पोलीसांची चाहुल लागताच तो घटनास्थळावरुन पळुन गेला. पोलीसांनी घटनास्थळावरील विदेशी दारुच्या 9 बाटल्या (किं.अं. 1,530/-रु.) जप्त करुन त्यांच्याविरुध्द गुन्हा नोंदवला आहे.

पो.ठा., लोहारा: हाबीब पिरमहंमद कारभारी, रा. हिप्परगा (स.), ता. लोहारा हा दि. 26.07.2020 रोजी मौजे हिप्परगा (स.) येथे दारुची विनापरवाना विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने देशी दारुच्या 20 बाटल्या (किं.अं. 1,400/-रु.) कब्जात बाळगला असतांना पो.ठा. लोहारा च्या पथकास आढला. पोलीसांनी नमूद मद्य जप्त करुन त्यांच्याविरुध्द गुन्हा नोंदवला आहे.

No comments