भूम : गुटखा विक्री करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखलपोलीस ठाणे, भूम कोविड- 19 संसर्गाच्या अनुशंगाने मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष यांच्या आदेशाने अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यात प्रत्येक शनिवारी जनता कफ्यु लागु करण्यात आला आहे. तसेच पानटपरी व्यवसायास बंदी असुन गुटखा- तंबाखुजन्य पदार्थास विक्रीस मनाई असतांनाही त्या मनाई आदेशांचे उल्लंघन करुन दि. 25.07.2020 रोजी 20.44 वा. सु. 1)मिनीनाथ नागनाथ नरके, रा. सुकटा, ता. भुम यांनी ‘श्रीकृष्ण पानस्टॉल’ तर 2)शौकत महम्मद हनीफ तांबोळी, रा. ईट, ता. भुम यांनी त्यांच्या दुकानात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला वेगवेगळ्या प्रकारचा गुटखा एकुण किं.अं. 3,915/-रु. चा माल विक्री करत असतांना पो.ठा. भुम च्या पथकास आढळले. यावरुन पोना- शशिकांत खोत यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 328, 188, 272, 273 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


अवैध मद्य प्रतिबंधक कारवाई

पो.ठा., उस्मानाबाद (ग्रा.): मच्छिंद्र सिताराम पवार, रा. सांजा, ता. उस्मानाबाद हा दि. 25.07.2020 रोजी मौजे सकनेवाडी शिवारातील सुजीत बकले यांच्या शेतातील शेडमध्ये दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने 9 ली. गावठी दारु (किं.अं. 650/-रु.) कब्जात बाळगला असतांना पो.ठा. उस्मानाबाद (ग्रा.) च्या पथकास आढळला. पोलीसांनी नमूद मद्य जप्त करुन वरील आरोपीविरुध्द गुन्हा नोंदवला आहे.

No comments