क्वारंटाईन गृह सोडले, 2 गुन्हे दाखलउस्मानाबाद -  मुकूंद वाघमारे, रा. भुम यांना कोविड- 19 संसर्गाच्या संशयावरुन भुम येथील गजानन महाराज मंदीर, शेल्टर होम येथे क्वारंटाईन केले होते. दि. 18.07.2020 रोजी रात्री 11.30 वा. ते गुपचूपपणे निवारा गृह सोडून निघून गेले. यावरुन ग्रामसेवक- बाप्पा काळे, यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुकूंद वाघमारे यांच्या विरुध्द भुम पो.ठा. येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
            दुसऱ्या घटनेत बशीर इस्माईल शेख, रा. वडगांव (देव), ता. तुळजापूर हे उपजिल्हा रुग्णालय, तुळजापूर येथे क्वारंटाईन असतांना दि. 18.07.2020 रोजी 09.00 वा. सु. तेथून गुपचूपपणे निघून गेले. यावरुन डॉ. श्रीधर जाधव यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन बशीर शेख यांच्या विरुध्द तुळजापूर पो.ठा. येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

चोरी

परंडा: सुरेश रतन कडबणे, रा. पंढरपुर, जि. सोलापूर हे दि. 17.07.2020 रोजी खोपोली, जि. रायगड ते भुम, ता. उस्मानाबाद असा ट्रक मध्ये सुर्यफुल तेल व पाम तेल पिशव्या वाहुन नेत होते. दरम्यान वालवड- भुम रस्त्यावरील मौजे सांगवी शिवारात रात्री 08.30 वा. सु. ट्रक चे इंधन संपले. यावर त्यांनी ट्रक बेवारस सोडुन इंधन आणन्यास गेले. इंधन घेउन 11.30 वा. परत आल्यावर त्यांना ट्रक मधील मालातील प्रत्येकी 1 लि. चे पाम तेलाचे 80 पिशव्या, सुर्यफुल तेलाच्या 336 पिशव्या, वनस्पती तेलाच्या अर्धा लिटरच्या 48 पिशव्या असा एकुण 38,502/-रु. चा माल चोरीस गेल्याचे दिसुन आले. अशा मजकुराच्या ट्रक चालक- सुरेश कडबणे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 19.07.2020 रोजी नोंदवला आहे.

 नळदुर्ग: हगलुर जिल्हा परिषद प्रा. शाळा, हगलुर, ता. तुळाजापूर या शाळेच्या दुरुस्तीसाठी आणलेली अडीच ब्रास शहाबादी फरशी किं.अं. 3,500/-रु. ची दि. 16.07.2020 रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या विठाबाई ज्ञानोबा गवळी, रा. हगलुर यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 18.07.2020 रोजी नोंदवला आहे.

अपघात

पोलीस ठाणे, उमरगा: सनमेश श्रीकांत साळुंके, रा. उमरगा हे दि. 28.04.2020 रोजी 19.00 वा. सु. उमराग बायपास रस्ता पायी चालत ओलांडत होते. यावेळी अज्ञात ट्रक चालकाने ट्रक निष्काळजीपणे, हयगईने चालवून सनमेश साळुंके यांना हुलकावनी दिली. यात ट्रकच्या पाठीमागील साखळी सनमेश साळुंके यांच्या पाठीत जोराची लागल्याने ते खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. अपघातानंतर जखमीस उपचाराची तजबीज न करता, अपघाताची खबर पोलीसांना न देता संबंधीत ट्रक्‍ चालक घटनास्थलावरुन निघून गेला. अशा मजकुराच्या सनमेश साळुंके यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन संबंधीत ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दि. 18.07.2020 रोजी नोंदवला आहे.


मारहाण

पोलीस ठाणे, परंडा: भारत चांगदेव गवारे, गोरख गवारे, दिपक गवारे, तीघे रा. जवळा (नि.), ता. परंडा यांनी दि. 25.06.2020 रोजी 12.30 वा. सु. मौजे जवळा (नि.) शेत गट क्र. 12 मध्ये शेताशेजारील गावकरी- भैरु हरी फोपले, यांना शेतबांधारुन रहदारीच्या कारणावरुन शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच भैरु फोपले यांच्या वडीलांना शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत भैरु फोपले यांचे दोन्ही हात मोडले आहेत. अशा मजकुराच्या भैरु फोपले यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन नमूद तीघांविरुध्द गुन्हा दि. 18.07.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments