उमरगा : अपघातात पुरुष मयत
पोलीस ठाणे, उमरगा: बाबुराव बळीराम जाधव, वय 58 वर्षे, रा. तुरोरी, ता. उमरगा हे दि. 22.07.2020 रोजी 20.00 वा. तुरोरी शिवारातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वरील प्रगती मोटर्स समोरुन पायी चालत जात होते. दरम्यान ट्रक क्र. एम.एच. 25 टी 3096 चा चालक- शहाजी रामराव इंगळे, रा. हत्तरगा (ह.), ता. निलंगा याने निष्काळजीपणे ट्रक चालवून बाबुराव जाधव यांना धडक दिली. यात ते गंभीर जखमी होउन उपचारादरम्यान मयत झाले. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरुन पळून गेला. अशा मजकुराच्या आनंद कृष्णाजी शिंदे, रा. तुरोरी यांच्या फिर्यादीवरुन नमूद ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दि. 26.07.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments