पिकाच्या कुंपनात विज प्रवाह सोडल्याने गायीचा मृत्यु, गुन्हा दाखलवाशी: लक्ष्मण अच्युत शिंदे, रा. बोरी, ता. वाशी यांनी मौजे बोरी येथील त्यांच्या शेतातील भुईमूंगाच्या पिकास तारेचे कुंपन करुन त्यात विद्युत प्रवाह सोडला होता. दि. 10.07.2020 रोजी 18.00 वा. सु. शेजारील अनिकेत बापु शिंदे यांची जर्शी गाय (किं.अं. 25,000/-रु.) त्या कुंपनास चिकटुन विद्युत झटक्याने मयत झाली आहे. अशा मजकुराच्या अनिकेत शिंदे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लक्ष्मण शिंदे यांच्या विरुध्द भा.दं.सं. कलम- 429 अन्वये दि. 14.07.2020 रोजी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नाकाबंदी दरम्यान 291 कारवाया- 60,500 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त

उस्मानाबाद  कोविड- 19 च्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने जमावबंदी व विविध मनाई आदेश लागू आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील 18 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत महत्वाच्या रस्त्यांवर वाहतुक शाखेच्या सहकार्याने दि. 14.07.2020 रोजी नाकाबंदी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान मोटार वाहन कायदा अंतर्गत 291 कारवाया करण्यात आल्या असुन त्यातून 60,500 ₹ ‘तडजोड शुल्क’ प्राप्त झाले आहे.


 अवैध मद्य प्रतिबंधक कारवाई

बेंबळी: लक्ष्मण वामन जाधव, रा. चिखली वस्ती, ता. उस्मानाबाद हा दि. 14.07.2020 रोजी आपल्या राहत्या घर समोर दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने देशी दारुच्या 15 बाटल्या (किं.अं.900/-रु.) कब्जात बाळगला असतांना पो.ठा. बेंबळी यांच्या पथकास आढळला. यावरुन त्याच्याविरुध्द पो.ठा. बेंबळी येथे गुन्हा नोंदवला आहे.

No comments