उस्मानाबाद ; आदेश झुगारुन दुकान चालू ठेवले, गुन्हा दाखल
 उस्मानाबाद (श.): कोविड- 19 संसर्गाच्या अनुशंगाने मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष यांच्या आदेशाने अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यात प्रत्येक शनिवारी जनता कर्फ्यु लागु करण्यात आला आहे. त्या मनाई आदेशांचे उल्लंघन करुन मुजाहिद आलिशर कुरेशी, रा. खाजानगर, उस्मानाबाद हे दि. 25.07.2020 रोजी 11.15 वा. सु. खाजानगर येथील स्वत:चे मटन दुकान चालू ठेउन व्यवसाय करत असतांना पो.ठा. उस्मानाबाद (श.) च्या पथकास आढळले. यावरुन पोउपनि- श्री दिनेश जाधव यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द गुन्हा नोंदवला आहे.

No comments