भूम : विनापरवाना विवाह सोहळा आयोजीत करुन गर्दी जमवली : गुन्हा नोंद



भूम : कोविड- 19 साथीमुळे विवाह सोहळ्याच्या आयोजनास जिल्हा प्रशासनाची परवानगी व व्यक्तींची संख्या निश्चीती- बंधनकारक करण्यात आली आहे. याचे उल्लंघन करुन दत्ता पुंडलीक टाळके, वय 47 वर्षे, रा. सांगवी (राळे), ता. भुम यांनी दि. 29.06.2020 रोजी दुपारी 12.00 वा. मौजे सांगवी (राळे) येथे विवाह सोहळ्याचे आयोजन केले. तसेच सोहळ्यात उपस्थितांची गर्दी निर्माण करुन कोविड- 19 आजाराच्या संसर्गाची शक्यता निर्माण केली. यावरुन संबंधीत गावच्या ग्रामसेविका- श्रीमती सुषमा गणेश स्वामी यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन दत्ता टाळके यांच्याविरुध्द पो.ठा. भुम येथे दि. 14.07.2020 रोजी गुन्हा नोंदवला आहे.

लॉकडाऊन असताना देखील कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता दोनशेहुन अधिक वऱ्हाडी मंडळी, नातेवाईक एकत्र करत राळेसांगवी या गावातच मोठ्या थाटामाटात झाला होता. विवाह सोहळा झाल्यानंतर चार दिवसानी मुलाचे वडील तनपुरे यांना त्रास होऊ लागल्याने मुलीचे वडील दत्तात्रय टाळके भूम येथे दवाखन्यात घेऊन आले होते. यावेळी तनपुरे व टाळके यांना कोव्हीड सेंटरमध्ये क्वारांटाईन करण्यात आले. दि. ३ जुलै रोजी दोघांचे स्वॅब घेण्यात आले. यानंतर दि. ५ जुलै रोजी मुलीच्या वडिलांचा आहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने लग्न समारंभाला उपस्थित असलेल्यांमध्ये धाकधूक वाढली. यानंतर त्यांच्या संपर्कातील साठ ते सत्तर जणांची यादी काढून क्वारंटाईन करून स्वॅब घेतले यामध्ये १७ जणांचे आहवाल कोरोना पॉझिटीव आले. राळेसांगवीची कोरोनाची संख्या १ वरून १८वर जाऊन पोहचली. आणखी यांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेतले असून त्यांचे अहवाल येणे शिल्लक आहे. 

अवैध मद्य प्रतिबंधक कारवाया


पो.ठा., ढोकी: विजय बबन सोनटक्के, रा. तडवळे (क.), ता. उस्मानाबाद हा दि. 13.07.2020 रोजी मौजे ढोकी शिवारात दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने 12 ली. गावठी दारु (किं.अं.720/-रु.) कब्जात बाळगला असतांना पो.ठा. नळदुर्ग यांच्या पथकास आढळला. यावरुन त्याच्याविरुध्द पो.ठा. ढोकी येथे गुन्हा नोंदवला आहे.

पो.ठा., मुरुम: धनराज शाहुराज सोनवणे, रा. नागुर, ता. लोहारा हा दि. 14.07.2020 रोजी मुरुम मोड परिसरात आर्यन ढाबा जवळ दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने देशी- विदेशी दारुच्या प्रत्येकी 180 मि.ली. च्या 38 बाटल्या (एकुण किं.अं.2,972/-रु.) कब्जात बाळगला असतांना पो.ठा. मुरुम यांच्या पथकास आढळला. यावरुन त्याच्याविरुध्द पो.ठा. ढोकी येथे गुन्हा नोंदवला आहे.




पो.ठा., कळंब: स्था.गु.शा. च्या पथकाने दि. 13.07.2020 रोजी 19.00 वा. सु. कळंब- लातुर रोडवरील भरत शेळके कॉम्प्लेक्स समोरील रस्त्याने जाणारी इनोव्हा कार क्र. एम.एच. 43 ए 7902 ही संशयावरुन अडवून तीची तपासणी केली. यात कारमधील अजित शिवाजी तांबडे, रा. उपळाई, ता. कळंब याने दारुचा विनापरवाना चोरटा विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने कार मध्ये देशी दारुचे 10 खोकी त्यात एकुण 480 बाटल्या (किं.अं.24,960/-रु.) बाळगली असल्याचे आढळले. यावर पथकाने नमूद देशी दारुसह वाहतुकीस वापरलेली कार जप्त करुन आरोपीस मुद्देमालासह पो.ठा. कळंब यांच्या ताब्यात दिले आहे.

No comments