उस्मानाबाद : अल्पवयीन मुलीचे अपहरण
 उस्मानाबाद ;  एका 16 वर्षीय मुलीचे (नाव- गाव गोपनीय) दि. 11.07.2020 रोजी 02.00 वा. सु. तीच्या राहत्या घराच्या परीसरातुन अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केले आहे. तर, दुसऱ्या घटनेत एका 16 वर्षीय मुलीचे दि. 12.07.2020 रोजी तीच्या घराच्या परिसरातुन अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केले. अशा मजकुराच्या दोन्ही अपहृत मुलींच्या कुटूंबीयांच्या प्रथम खबरेवरुन अज्ञात व्यक्तीविरुध्द भा.दं.सं. कलम- 363 अन्वये 2 स्वतंत्र गुन्हे दि. 13 व 14.07.2020 रोजी नोंदवले आहेत.

चोरी
पोलीस ठाणे, बेंबळी: दशरथ महादेव राउत, रा. महाळंगी, ता. उस्मानाबाद यांनी त्यांची हिरो स्प्लेंडर मो.सा. क्र. एम.एच. 25 एए 4013 ही दि. 10.07.2020 रोजी 23.00 वा. सु. आपल्या राहत्या घरा समोर लावली होती. ती त्यांना दुसऱ्या दिवशी लावल्या जागी आढळुन आली नाही. यावरुन अज्ञात चोरट्याने ती चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या दशरथ राउत यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द भा.दंसं. कलम-379 अन्वये गुन्हा दि. 13.07.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): सुनिता जयंत ढवळे, रा. गावसुद, ता. उस्मानाबाद या दि. 11.07.2020 रोजी रात्री कुटूंबीयांसह घरात झोपल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास पाठीमागील दरवाजाची कडी अज्ञात चोरट्याने हात घालून उघडून कपाटातील 12 ग्रॅम सोन्याचे दागिने, 130 ग्रॅम चांदीच्या वस्तू, तसेच घरातील संसारोपयोगी तांब्या- पितळेची भांडी, ग्राईंडर असे एकुण 58,270/-रु. किंमतीचे साहित्य चोरुन नेले आहेत. अशा मजकुराच्या सुनिता ढवळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द भा.दंसं. कलम- 457, 380 अन्वये दि. 14.07.2020 रोजी गुन्हा नोंदवला आहे.

No comments