Header Ads

बलसूर : शेतीच्या वादातून एकाचा खून


 उमरगा: पंडीत निवृत्ती महानुरे, वय 52 वर्षे, रा. मुरुम, ता. उमरगा हे मौजे बलसुर शिवारातील राधाकृष्ण तोष्णीवाल यांच्या शेतात दि. 25.07.2020 रोजी दुपारी काम करत होते. यावेळी शेत मजूर- बसवराज बाबुराव माळी, रा. रामलिंग (मु.), ता. निलंगा याने शेत मजुरीच्या वादावरुन पंडीत महानुरे यांच्या डोक्यात कठीन वस्तुने मारहाण केल्याने त्यांचा मृत्यु झाला. अशा मजकुराच्या खंडु पंडीत महानुरे (मयताचा मुलगा) यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बसवराज माळी याच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 302, 504, 506 अन्वये गुन्हा दि. 25.07.2020 रोजी नोंदवला आहे.


नळदुर्ग : धनादेश न वटल्याने लाथाबुकक्यांनी मारहाण 

नळदुर्ग: गणेश सिध्द्दाराम कोरे, रा. जळकोट, ता. तुळजापूर हे दि. 23.07.2020 रोजी 11.30 वा. मौजे जळकोटवाडी येथील महाराजा हॉटेल च्या पाठीमागे थांबले होते. यावेळी गावातीलच- अभिषेक गंगणे, योगेश गंगणे, महादेव बारदाणे, प्रविण जाधव, रमेश कुंभार, ईश्वर जाधव अशा सहा व्यक्तींनी बँकेतील धनादेश न वटल्याच्या भांडणावरुन गणेश कोरे यांना लाकडाने व लाथाबुकक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. या मारहाणीत गणेश यांचा डावा हात मोडला. अशा मजकुराच्या गणेश कोरे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन नमूद सहा व्यक्तींविरुद गुन्हा दि. 26.07.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments