उस्मानाबाद  जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल 
पो.ठा., तुळजापूर: अलीशेर मुस्सामिया कुरेशी, व्यवसाय- जनावरांचे व्यापारी, रा. औसा, जि. लातुर यांसह त्यांचा नोकर- सिध्देश्वर महादेव बनसोडे असे दोघे दि. 23.07.2020 रोजी 10.00 वा. सु. मौजे तिर्थ, ता. तुळजापूर येथील नागोबा मंदीरामागील लवणातून जात होते. यावेळी परमेश्वर गणपत शिंदे, रा. हंगरगा पाटी, ता. तुळजापूर व अन्य 3 व्यक्ती अशा चौघांनी त्यांना तलवारीचा धाक दाखवून, काठीने मारहाण करुन अलीशेर कुरेशी यांच्या जवळील 60,000/-रु. व दोन मोबाईल फोन जबरीने घेउन गेले. अशा मजकुराच्या अलीशेर कुरेशी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन संबंधीत चौघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 394, 506 अन्वये गुन्हा दि. 23.07.2020 रोजी नोंदवला आहे.


पो.ठा., आंबी: सुधीर संदीपान बोराडे, रा. पाथ्रुड, ता. भुम हे दि. 23.07.2020 रोजी रात्री 10.30 वा. ऑटोरिक्षाने मौजे देवगाव चौकातून जात होते. यावेळी एक स्वीफ्ट कार क्र. एम.एच. 14- 6151 मधुन आलेल्या दोन व्यक्ती तसेच एका मोटारसायकलवर आलेल्या दोन व्यक्ती अशा 4 अनोळखी व्यक्तींनी ऑटोरिक्षा अडवून थांबवली. त्या चौघांनी ऑटोरिक्षा चालक- विजय खुने यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन सुधीर बोराडे यांच्या विजारीच्या खिशातील 4,000/-रु. जबरीने काढून घेतले. अशा मजकुराच्या सुधीर बोराडे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन अज्ञात 4 व्यक्तींविरुध्द भा.दं.सं. कलम- 392 अन्वये गुन्हा दि. 24.07.2020 रोजी नोंदवला आहे.


पो.ठा., कळंब: शरद दत्तात्रय जोशी, रा. बाबानगर कळंब यांच्या टिळक रोड, कळंब येथील ‘लोकमान्य ईलेक्ट्रीकल्स’ या गुदामाचा पत्रा अज्ञात चोरट्याने दि. 21.07.2020 रोजी मध्यरात्री उचकटुन गुदामातील विप्रो कंपनीचे नादुरुस्त एल.ई.डी. बल्ब 70 नग व इन्सुलेटर (मनी) सहा बॅग असे एकुण 7,200/-रु. किंमतीचे चोरुन नेले आहेत. अशा मजकुराच्या शरद जोशी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 24.07.2020 रोजी नोंदवला आहे.
मारहाण 

पो.ठा., भुम: गोरख मनोहर भोरे, रा. भाजेराव वस्ती, जांब, ता. भुम हे दि. 15.07.2020 रोजी 17.30 वा. सु. आपले शेत गट क्र. 316 मध्ये जनावरे चारत होते. यावेळी भाऊबंद- शिवाजी भोरे, उमा भोरे या दोघा पती- पत्नीने पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन गोरख भोरे यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. यात गोरख भोरे यांचा डावा डोळा कायमस्वरुपी निकामी झाला. अशा मजकुराच्या गोरख भोरे यांच्या फिर्यादीवरुन नमूद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 23.07.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments