उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल
कळंब -  संजय बिभीषण भांगे, रा. गोविंदपुर, ता. कळंब यांनी आपली बजाज सिटी 100 मो.सा. क्र. एम.एच. 25 एपी 1984 ही दि. 11.07.2020 रोजी 19.30 वा. सु. कळंब येथील भोजराज हॉटेल च्या समोर लावली होती. ती अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. तर दुसऱ्या घटनेत गोपालसिंग राजपूत, रा. खामसवाडी, ता. कळंब यांची नोंदणी नसलेली एचएफ डीलक्स मोटारसायकल ही दि. 17.07.2020 रोजी मध्यरात्री राहत्या घरा समोरुन अज्ञात चोरट्याने चोरली आहे. अशा मजकुराच्या नमूद दोघांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुध्द 2 स्वतंत्र गुन्हे दि. 17 व  18.07.2020 रोजी नोंदवले आहेत.

 ढोकी - पवन टेकमन पटेल, रा. ढोकी, ता. उस्मानाबाद हा दि. 17.07.2020 रोजी 17.15 वा. सु. तेरणा शेतकरी सहकारी कारखाना, ढोकी येथील डिस्टीलरी बॉटलींग संयंत्रामधील गिअर बॉक्स ची चैन (किं.अं. 5,000/-रु.) चोरुत नेत असतांना पहारेकरी- गोरोबा रामहरी येरकळ, रा. गोवर्धनवाडी, ता. उस्मानाबाद यांना आढळला. अशा मजकुराच्या गोरोबा येरकळ यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पवन पटेल याच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा दि. 17.07.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

उस्मानाबाद - सुरज रायबान, रा. रायबान गल्ली, उस्मानाबाद हा दि. 17.07.2020 रोजी 21.00 वा. सु. मारवाड गल्ली, उस्मानाबाद येथील मनोज कोचेटा यांच्या कापड दुकानाच्या गुदामातून तयार कपड्यांनी भरलेली पिशवी (किं.अं. 8,000/-रु.) घेउन जात होता. हा प्रकार मनोज कोचेटा यांच्या कुटूंबीयांनी बघून हटकले असता त्याने हातातील कोयत्याचा धाक दाखवला. तसेच थोड्या अंतरावर ऋषीकेश दळवी यांनी त्यास हटकले असता त्यांनाही कोयत्याचा धाक दाखवला. अशा मजकुराच्या मनोज कोचेटा यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन सुरज रायबान याच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 392, 511, 504 सह भा.ह.का. कलम- 4, 25 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

No comments