Header Ads

नाकाबंदी दरम्यान 302 कारवाया- 62 हजार  तडजोड शुल्क प्राप्त




उस्मानाबाद - कोविड- 19 च्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने जमावबंदी व विविध मनाई आदेश लागू आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील 18 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत महत्वाच्या रस्त्यांवर वाहतुक शाखेच्या सहकार्याने दि. 15.07.2020 रोजी नाकाबंदी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान मोटार वाहन कायदा अंतर्गत 302 कारवाया करण्यात आल्या असुन त्यातून 62,000 ₹ ‘तडजोड शुल्क’ प्राप्त झाले आहे.



अपघात

पोलीस ठाणे, मुरुम: जाफर अब्दुलकादर शिकलकर व अब्दुलकादर शिकलकर, दोघे रा. मुरुम, ता. उमरगा हे दोघे दि. 05.06.2020 रोजी 15.20 वा. सु. मौजे मुरुम येथील माधवराव पाटील कॉलेज समोरील रस्त्याने मो.सा. क्र. एम.एच. 25 एयु 9186 वरुन जात होते. यावेळी एका अनोळखी मो.सा. चालकाने मो.सा. निष्काळजीपणे, हयगईने चालवून जाफर शिकलकर चालवत असलेल्या नमूद मो.सा. ला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात पाठीमागे बसलेले अब्दुलकादर शिकलकर हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमीस उपचारास न नेता, अपघाताची खबर पोलीसांना न देता संबंधी मो.सा. चालक घटनास्थळावरुन निघून गेला. अशा मजकुराच्या जाफर शिकलकर यांच्या फिर्यादीवरुन संबंधीत अनोळखी मो.सा. चालकाविरुध्द गुन्हा दि. 15.07.2020 रोजी नोंदवला आहे.


मारहाण


पोलीस ठाणे, तामलवाडी: धुळोबा भगवान मार्कड, रा. गोंधळवाडी, ता. तुळजापूर हे दि. 14.07.2020 रोजी 11.30 वा. सु. गावातील- लक्ष्मण बाबा शिरगिरे यांच्या शेतात गेले असता लक्ष्मण शिरगिरे यांसह त्यांच्या कुटूंबातील- बाबा, उज्वल, भागुबाई अशा चौघांनी आपल्या शेतात आल्याच्या कारणावरुन धुळोबा मार्कड यांना शिवीगाळ करुन, लोखंडी गजाने, चाबकाने, मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या धुळोबा मार्कड यांच्या फिर्यादीवरुन नमूद चौघांविरुध्द गुन्हा दि. 15.07.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments