पोलीसांच्या सतर्कतेने ऑनलाईन फसवणुकीतील ९० हजार मुळ मालकास परत
शिराढोण: विशाल सुरेश तांबवे, रा. माळकरंजा, ता. कळंब यांनी ऑनलाईन खरेदीद्वारे जुनी स्कुटर खरेदी करण्याचा सौदा केला होता. समोरील व्यक्तीने भुल-थापा मारुन विश्वास संपादन करुन वेळोवेळी विशाल तांबवे यांच्याकडून एकुण 1,37,000 ₹ रक्कम गुगल पे व पेटीएम या ऑनलाईन प्रणालीद्वारे घेतले होते. कालांतराने आपली फसवणूक झाल्याची त्यांना जाणीव झाली. यावर त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार अर्ज दिला होता. अर्ज चौकशीत शिराढोण पो.ठा. चे सपोनि- श्री उत्तम जाधव पोहेकॉ- शिवाजी गवळी, पोकॉ- गोविंद पवार यांनी सायबर पो.ठा. च्या मदतीने पाठपुरावा करुन गुगल पे व पेटीएम यांच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. फसवणुकीद्वारे लुटलेली रक्कम ज्या खात्यात जमा झाली होती तेथे 90,000 ₹ रक्कम शिल्लक होती. पोलीसांच्या प्रयत्नाने ती रक्कम पुन्हा विशाल तांबवे यांच्या खात्यावर वळवण्यात आली. रक्कम परत मिळाल्याने आनंदी होउन विशाल तांबवे यांनी पोलीसांचे आभार व्यक्त केले.   

No comments