Header Ads

अपहृत अल्पवयीन मुलीची सुटका, 2 गुन्ह्यातील 2 आरोपी अटकेत
 आंबी एका 22 वर्षीय तरुणाने गावातीलच एका 15 वर्षीय मुलीस (नाव- गाव गोपनीय) फुस लावून तीचे अपहरण केले होते. यावरुन आंबी पो.ठा. येथे गु.र.क्र. 68/2020 हा दाखल आहे. तपासादरम्यान स्था.गु.शा. च्या पथकाने सायबर पो.ठा. च्या मदतीने त्यांचा शोध घेउन दि. 13.07.2020 रोजी आरोपीस अटक केली असुन त्याच्या ताब्‌यातून अपहृत मुलीची मुक्तता करुन तीला पालकांच्या ताब्यात दिले आहे. तसेच अपहरणास वापरलेली मोटारसायकल जप्त केली आहे.

 उमरगा : तर लोकसेवकास मारहाण करुन त्याच्या कर्तव्यात अडथळा आणनारा उमरगा पो.ठा. गु.र.क्र. 141/2019 या न्यायप्रविष्ट गुन्ह्यातील फरार आरोपी- लहु जीवन साळुंके, रा. तलमोड, ता. उमरगा यास स्था.गु.शा. च्या पथकाने दि. 13.07.2020 रोजी ताब्यात घेउन उर्वरीत कार्यवाही कामी उमरगा पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई स्था.गु.शा. चे पो.नि. श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि- श्री आण्णाराव खोडेवाड, पोहेकॉ- रोकडे, जगदाळे, काझी, विजय घुगे, पोना- शेळके, पोकॉ- पांडुरंग सावंत, सर्जे, महिला पोकॉ- सोनवणे यांच्या पथकाने केली आहे.

No comments