Header Ads

पोलीस पाटलाच्या कर्तव्यात अडथळा, गुन्हा दाखल
बेंबळी: कोविड- 19 रोगाच्या संक्रमनास आळा बसावा यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सार्वजनिक ठिकाणी फिरतांना सामाजीक अंतर पाळणे, नाका- तोंडास मास्क लावणे बंधनकारक आहे. असे असतांनाही हा मनाई आदेश झुगारुन ज्योतीराम राजेंद्र सावंत, रा. बोरगांव (राजे), ता. उस्मानाबाद हे दि. 10.07.2020 रोजी 17.00 वा. सु. सार्वजनिक ठिकाणी गावात नाका- तोंडास मास्क न लावता फिरत होते. यावर पोलीस पाटील- औदुंबर क्षिरसागर यांनी त्यांना मास्क न लावता फिरण्यास मनाई केली. त्यावर ज्योतीराम सावंत यांनी चिडुन क्षिरसागर यांना शिवीगाळ करुन धमकावले. अशा मजकुराच्या पोलीस पाटील- औदुंबर क्षिरसागर यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन सावंत यांच्याविरुध्द भा.दंसं. कलम- 189, 269, 270, 504, 506 अन्वये गुन्हा दि. 10.07.2020 रोजी नोंदवला आहे.

जुगार प्रतिबंधक कारवाई

 उस्मानाबाद(श.): मकबुल रसुल टकारी, रा. रसुलपुरा, उस्मानाबाद हा दि. 11.07.2020 रोजी वैराग रोड लगत असलेल्या दुकाना जवळ कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह रोख रक्कम 1,325/-रु. च्या मालासह पो.ठा. उस्मानाबाद (श.) च्या पथकास आढळुन आला. यावरुन त्याच्याविरुध्द गुन्हा नोंदवला आहे.

अवैध मद्य प्रतिबंधक कारवाई

पो.ठा., भुम: भरत रमेश मारकड, रा. सोनगीरी, ता. भुम हा दि. 10.07.2020 रोजी मौजे सोनगीरी येथे दारुचा विनापरवाना विक्री व्यवसाय करत असतांना पो.ठा. भुम यांच्या पथकास आढळला. पोलीसांची चाहुल लागताच तो घटनास्थळावरुन पळून गेला. पोलीसांनी सदर ठिकाणाहुन देशी दारुच्या 8 बाटल्या (किं.अं. 640/-रु.) जप्त करुन भरत मारकड याच्याविरुध्द गुन्हा नोंदवला आहे.

चोरी

 उस्मानाबाद (श.): सचिन उत्तम कुलकर्णी, रा. गौडगाव, ता. उस्मानाबाद यांनी त्यांची एचएफ डीलक्स मो.सा. क्र. एम.एच. 13 बीएक्स 9230 ही दि. 10.07.2020 रोजी रात्री 01.00 वा. सु. उस्मानाबाद येथील श्रीकृष्णनगर, स्वामी प्लॉट्स च्या बाजूस लावली होती. ती त्यांना दुसऱ्या दिवशी लावल्या ठिकाणी आढळली नाही. यावरुन ती अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या सचिन कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 11.07.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments